मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली होती. त्यावेळी केंद्रात देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला. आज विधानसभेत शिवसेनेचे आमदार किशोर दराडे यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदार मनिषा कांयदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; ‘अधीश’ बंगला प्रकरणी उच्च न्यायालयात धाव
वृक्ष लागवडीवरून मनिषा कांयदे यांनी भाजपवर टीका करताना म्हणाल्या की, 33 कोटी वृक्षलागवड करण्यासाठी हा 33 आकडा कशावरून ठरवला. हा एक संशोधन करण्याचा विषय आहे. गेल्या तीन वर्षापासून याबद्दल माध्यमांमध्ये सतत बातम्या येत आहेत. हे किती खोटं होतं. फक्त इव्हेंटबाजी होती. याबाबत अनेक वर्तमानपत्रातद्वारे माहिती समोर आली आहे. यावर चौकशी झाली. पंरतु डोस काही नसल्याचंही मनिषा कायंदे म्हणाल्या.
पिंपरी-चिंचवडमधील आत्मकेंद्री राजकारण्यांना आमदार महेश लांडगेंची ‘ॲ लर्जी’
शिवसेनेचे आमदार किशोर दराडे यांनी एका तालुक्यासंदर्भात वृक्षलागवडीबाबत मुद्दा उपस्थित केला. नोकऱ्यांचा आमीष दाखवून, वनखात्यांमध्ये नोकरी देतो म्हणून, गुगल पे वरून चाळीस हजार रूपये ट्रान्संपर केले असतील. तर संपुर्ण महाराष्ट्रात काय घडलं असेल ? यावर एसआयटी स्थापन करणार का ? अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
”धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढल्यास तो सुपर डुपर चालेल”; करूणा शर्माचं वादग्रस्त वक्तव्य
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशात सध्या विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये ख़डाजंगी बघायला मिळत आहे. अनेक नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं पेटलं आहे.
Read also:
- मैदानात येऊन आमच्याशी लढा, नामर्दांसारख्या आम्हाला नोटीसा पाठवू नका; नितेश राणेंची बोचरी टीका
- भाजपचे वरचे नेते अनुकुल मात्र..; पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिल्याने सतेज पाटलांची प्रतिक्रिया
- मग तुमच्या सरकारच्यावेळी महाराजांचा विधानसभेत फोटो का नाही लावला? अजित पवारांचं भाजपला प्रत्युत्तर
- ठाकरे सरकार हे डोक्यावर पडलेलं सरकार; तथाकथित रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ कडाडल्या
- तथाकथित रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण पेटलं; पीडित तरुणीचे संजय राऊत, नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप