मुंबई : कॅंग्रेसच्या हातून आपने पंजाबमधील सत्ता हिसकावून घेतली आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भगवतं मन यांची पंजाबच्या मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली आहे. अशातच आता राज्यसभेसाठी आपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पंजाबच्या राजकारणात संदीप पाठकची महत्वाची भूमिका राहिली आहे. त्यांना राज्यसभेसाठी तिकीट देखील देण्यात आलं आहे. परंतु यामध्ये मराठी अभिनेता संदीप पाठक सध्या वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.
नागपुरकरांना मुंबई प्रिय तर आम्हा लोकांना नागपुर; संजय राऊतांचा फडणवीसांना चिमटा
संदीप पाठकने आप उमेदवार म्हणून त्याचे फोटो ट्विटवरून वापरण्यावरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, तो मी नव्हेच! आपचे डॉ. संदीप पाठक ह्यांची पंजाबमधून राज्यसभेवर निवड झाली आहे. माझी नाही. बऱ्याच ठिकाणी, काही चॅनलवर माझे फोटो वापरत आहेत. आप’ ल्याला ह्यात ओढू नका. असं ट्विट त्यांनी केलं आहे. तसेच त्या ट्विटला अरविंद केजरीवाल यांना देखील टॅग केले आहे.
” हिंदुत्वातलं जाज्वल्य सोडलं अन् सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवलं “
दरम्यान,पंजाबमधून आपने संदीप पाठक यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. संदीप पाठक हे आयआयटीमध्ये भौतिकशास्त्रचे प्राध्यापक आहेत. ते आपचे राष्ट्रीय संयोजक असून केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मन यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून देखील त्यांची ओळख आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजप जिंकेल; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा
भारताचा माजी स्टार फिरकीपटू गोलंदाज हरभजनसिंगला देखील पंजाबमधून राज्यसभेसाठी अरविंद केजरीवाल यांनी टिकीट दिलं आहे. गेल्या तीन वर्षापासून पंजाबमध्ये तळ ठोकून बुध लेव्हलला संघटना मजबुत करण्याचं काम केल्यामुळे संदीप पाठक यांना राज्यसभेसाठा उमेदवारी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे.
तो मी नव्हेच 😬 आप चे डॅा. संदीप पाठक ह्यांची पंजाब मधून राज्यसभेवर निवड झाली आहे माझी नाही. बऱ्याच ठिकाणी, काही चॅनल वर माझे फोटो वापरत आहेत. “आप”ल्याला ह्यात ओढू नका 😂 #Aap #sandeeppathak #Actorsandeeppathak @AamAadmiParty @ArvindKejriwal pic.twitter.com/93jwwaKMnl
— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) March 21, 2022
Read also:
- सोलापुरात सचिन वाझे पॅटर्न स्टिंग ऑपरेशनमुळे महाविकास आघाडीला दुसरा धक्का
- उसाला दर नाही म्हणून विधानभवन परिसरात गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांचं आंदोलन
- “कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी क्षीरसागरांवर “; ठाकरेंचे आदेश
- “२० वर्षांपासून सातत्याने भ्रष्टाचार करणाऱ्या दरेकरांची आमदारकी काढा”; काँग्रेसची आक्रमक मागणी
- उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा; मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी यावरून शिवसेनेची टीका