कोल्हापूर : उत्तरेत विधानसभा पोटनिवडणुकीत कमालीच्या घडामोडी मागील दोन-तीन दिवसांमध्ये घडून आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटील आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.
गुढी पाडव्याला मनसेचे मुबंईत विराट शक्तिप्रदर्शन; महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे रणशिंग फुंकणार
चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोल्हापुरची जागा सात पैकी पाच वेळा शिवसेना आणि दोन वेळा काॅंग्रेसने जिंकली होती. त्यातून ही जागा त्यांनी आता काॅंग्रेसला दिल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते हतबल झाले आहे. रोज सकाळी उठून नवाब मलिकांच्या समर्थनार्थ मोर्चे काढावे लागत असल्याने, अजानची स्पर्धा घ्यावी लागत असल्याची टिका त्यांनी केली
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण; पुणे पोलीस उपायुक्त पंकड डहाणे यांची कसुन चौकशी
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, या निवडणुकीत अस्वस्थ शिवसैनिकांना आपल्याला हवं ते करण्याची संधी आहे. ही संधी गेली तर काॅंग्रेस कायमची तुमच्या मानगुटीवर बसेल. बंटी पाटील हा माणसं खाणारा माणुस आहे, असं खळबळजनक वक्तव्य देखील चंद्रकांत पाटलांनी केलं. तसेच सावध रहा. उद्या संजय राऊत आम्ही आमच्या घरचं पाहुन घेऊ म्हणतील. तुमच्या घरी काय सुरू आहे हे रोज टीव्ही सुरू केल्यावर दिसतंय असंही ते म्हणालेत.
“आगे आगे देखो होता है क्या”; ईडीच्या कारवाईनंतर राणेंचा शिवसेनेला सूचक इशारा
दरम्यान, आता जरी शिवसेना पदाधिकारी जयश्री जाधव यांचा प्रचार करत असले तरी पुढच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष ताकदीने कोल्हापूर उत्तरेत आपला झेंडा फडकवेल असे मनसुबे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी काल मूंबईत झालेल्या बैठकीत बोलून दाखवले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला बैठकीला मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील, मंत्री उदय सामंत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.
Read also:
- आयुक्त कैलाश जाधवांच्या बदलीचे नक्की कारण काय? नाशिक पालिकेत रमेश पवार यांची नियुक्ती
- पुणे स्थायी समिती अध्यक्ष अधिकार वाद; महापालिकेच्या विरोधात हेमंत रासने थेट न्यायालयात
- “सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडणार”; किरीट सोमय्यांचा एल्गार
- राणें पाठोपाठ मोहित कंबोज निशाण्यावर; मुंबई महानगरपालिकेडून राहत्या सोसायटीमध्ये झाडाझडती
- काश्मीर फाईल्स इंटरवलनंतर फार बोरिंग सिनेमा; जयंत पाटलांचा फडणवीसांना मिश्कील टोला