मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने काल कारवाई केली. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून महाविकास आघाडीला एक मोठा धोका निर्माण झाला आहे. ईडीने उद्धव ठाकरे यांचे मेहुण्याची 6 कोटीपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. अशातच आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी अजून सहा मंत्र्यांचे घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे.
पत्रकार परिषेदमध्ये बोलत असताना किरीट सोमय्या म्हणाले की, श्रीधर पाटणकर आणि कारनानमे यावर मी गेले तीन वर्ष पाठपुरावा करत आलो आहे. पाटणकर यांच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता असुन या प्रकरणात 30 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांच्या आरोपावर मुख्यमंत्री काय उत्तर देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई; 6 कोटीपेक्षा अधिक संपत्ती जप्त
सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडणार आहे. असं म्हणत त्यांनी नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध काय ?उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईकांचे काय संबंध ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. ईडीने पुष्पक बुलियन प्रकरणात ठाण्यातील प्रकल्पातील 11 सदनिकावर कारवाई केली आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालिकीच्या या सदनिका असल्याचं सांगण्यात येत आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे भाऊ आणि उद्धव ठाकरे यांचे मेहुणे होत. याअगोदर देखील मनी लॉण्डिंगप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच माहितीच्या आधारे त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.
तुम्ही सगळे श्रेय घ्या, पण एसटीचा संप मिटवा; चंद्रकांत पाटलांचं राज्य सरकारला आवाहन
कर्जत येथील वैजनाथ देवस्थान येथील जमीनाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. वैजनाथ येथील शंकराचे देवस्थान असून त्याठिकाणी हा प्रकार झाल्याचा आरोप होता. त्यात एका सलीम नावाच्या व्यक्तीच्या नावावर ती जमीन केली होती. त्यानंतर ती जमीन श्रीधर पाटणकर यांच्यानावे केला असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.
Read also:
- राणें पाठोपाठ मोहित कंबोज निशाण्यावर; मुंबई महानगरपालिकेडून राहत्या सोसायटीमध्ये झाडाझडती
- काश्मीर फाईल्स इंटरवलनंतर फार बोरिंग सिनेमा; जयंत पाटलांचा फडणवीसांना मिश्कील टोला
- गुढी पाडव्याला मनसेचे मुबंईत विराट शक्तिप्रदर्शन; महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे रणशिंग फुंकणार
- रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण; पुणे पोलीस उपायुक्त पंकड डहाणे यांची कसुन चौकशी
- “आगे आगे देखो होता है क्या”; ईडीच्या कारवाईनंतर राणेंचा शिवसेनेला सूचक इशारा