मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकारणाला चांगलाच ऊत आलेला दिसत आहे. शिवसेना सध्या मुंबई महानगरपालिकेच्या केंद्रस्थानी असल्याने शिवसेना नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून जबरदस्त छापेमारी सुरु आहे. एकाबाजूला छापेमारी सुरु आहे तर दुसऱ्या बाजूने महानगरपालिकेच्या नोटिसा भाजपच्या नेत्यांना मिळत आहेत. एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी दोन्ही पक्ष सोडत नाही अशी काहीशी परिस्थिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई; 6 कोटीपेक्षा अधिक संपत्ती जप्त
मागील काही केंद्रीय मंत्री नारायण राणे हे वारंवार शिवसेनेच्या विरोधात बोलत असल्यामुळे त्यांच्यावर काहीसा दबाव टाकण्यासाठी काही हालचाली झाल्या. जुहू येथे असणाऱ्या नारायण राणेंच्या बंगल्याचे बांधकाम अनाधिकृत असल्याच्या कारणावरून बंगला पडण्याची नोटीस पालिकेने दिली होती. उच्च न्यायालयात हे प्रकरण सध्या सुरु असून याला स्थिगिती देण्यात आली आहे.
तुम्ही सगळे श्रेय घ्या, पण एसटीचा संप मिटवा; चंद्रकांत पाटलांचं राज्य सरकारला आवाहन
आणखी एक नाव भाजपमधून अत्यंत आक्रमतेने समोर येत होतं आणि ते नाव म्हणजे मोहित भारतीय उर्फ कंबोज. मोहित कंबोज यांनी मागील काही दिवसांमध्ये थेट शिवसेना खासदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. एवढंच नाही तर नवाब मलिक प्रकरणातही मोहित कंबोज यांनी बरीच माहिती केंद्रीय यंत्रणांना दिल्याचे बोलले जाते. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर मोहित कंबोज यांनी मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं होतं आणि अजूनही काही शिवसेना नेते तुरुंगात जातील असा इशारा दिला होता.
उच्च न्यायालयाकडून नारायण राणेंना अधिश बंगल्याप्रकरणी दिलासा ; नितेश राणेंचा सेनेला ‘हा’ गंभीर इशारा
आता मोहित कंबोज यांनाही महानगरपालिकेकडून नोटीस धाडण्यात आलेली आहे. सुरुवातीला त्यांचे थेट नाव टाळण्यात आले होते मात्र आता मोहित कंबोज राहत असलेल्या सोसायटीची झाडाझडती पालिका अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. सांताक्रूझ येथे मोहित कंबोज एका सोसायटीमध्ये राहतात जिला २ दिवसांपूर्वी नोटीस दिली गेल्याची माहिती समोर आली आहे.
Read also:
- काश्मीर फाईल्स इंटरवलनंतर फार बोरिंग सिनेमा; जयंत पाटलांचा फडणवीसांना मिश्कील टोला
- गुढी पाडव्याला मनसेचे मुबंईत विराट शक्तिप्रदर्शन; महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे रणशिंग फुंकणार
- रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण; पुणे पोलीस उपायुक्त पंकड डहाणे यांची कसुन चौकशी
- “आगे आगे देखो होता है क्या”; ईडीच्या कारवाईनंतर राणेंचा शिवसेनेला सूचक इशारा
- “आता ही ईडी गावागावात गेलीय “; मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकावर झालेल्या कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया