पुणे : महानगरपालिकेची तोंडावर आलेली निवडणूक ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुढे ढकलण्यात आली. आता पुढील सहा महिन्यांसाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. असं असलं तरी सध्या पुणे महानगरपालिकेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष सुरु असल्याचे चित्र नुकतेच समोर आले आहे.
“आगे आगे देखो होता है क्या”; ईडीच्या कारवाईनंतर राणेंचा शिवसेनेला सूचक इशारा
पुणे महापालिका विद्यमान सभागृहाची मुदत १४ मार्च रोजी संपली आहे. या कारणाने राज्य सरकारने पालिकेच्या आयुक्तांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. विद्यमान सभागृहाची मुदत संपल्याने आता महापालिकेचा सर्व कारभार प्रशासक यांच्याकडे गेला आहे. यात एक विलक्षण गोष्ट घडून आली आहे ती म्हणजे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आपले अधिकार अजूनही अबाधित असल्याचा दावा केला आहे.
या संदर्भात त्यांनी थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. स्थायी समितीसह इतर समित्यांची जबाबदारी प्रशासक नियुक्त व्यक्तीकडे सोपवण्याचा निर्णय हा चुकीचा आहे असा दावा हेमंत रासने यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. महापालिकेची पाच वर्षांची मुदत संपल्याने आता सर्व विद्यमान नगरसेवक हे माजी नगरसेवक झाले आहेत. मात्र स्थायी समिती कधीही बरखास्त होत नाही, त्यामुळे तिचे काम थांबवता येणार नाही असं स्थायी समितीचे अध्यक्ष हेंमत रासने यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई; 6 कोटीपेक्षा अधिक संपत्ती जप्त
स्थायी समिती निर्णय घेऊ शकते असा दावा करुन पुढील वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर करुन ते अंतिम मान्यतेसाठी मुख्यसभेसमोर दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला मात्र त्याच दिवशी विद्यमान सभागृहाची मुदत संपल्याने गोंधळ वाढला आहे. या सर्व गदारोळामुळे हेमंत रासने यांनी महापालिका, महापालिका आयुक्त, प्रशासक, नगर विकास विभागाचे मुख्य संचिव यांच्या विरुद्ध याचिका दाखल केली आहे.
Read also:
- “सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडणार”; किरीट सोमय्यांचा एल्गार
- राणें पाठोपाठ मोहित कंबोज निशाण्यावर; मुंबई महानगरपालिकेडून राहत्या सोसायटीमध्ये झाडाझडती
- काश्मीर फाईल्स इंटरवलनंतर फार बोरिंग सिनेमा; जयंत पाटलांचा फडणवीसांना मिश्कील टोला
- गुढी पाडव्याला मनसेचे मुबंईत विराट शक्तिप्रदर्शन; महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे रणशिंग फुंकणार
- रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण; पुणे पोलीस उपायुक्त पंकड डहाणे यांची कसुन चौकशी