कोल्हापूर : उत्तरेत विधानसभा पोटनिवडणुकीत कमालीची रंगत बघायला मिळत आहे. यानिवडणुकीवरून अनेक राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. बंटी पाटील हा माणसं खाणारा माणुस आहे, असं धक्कादायक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. आता याच पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी आता चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.
काश्मीर फाईल्स इंटरवलनंतर फार बोरिंग सिनेमा; जयंत पाटलांचा फडणवीसांना मिश्कील टोला
सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत आता भाजपच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. त्यामुळे ते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. निवडणुक का लढवली याची चुक त्यांना लक्षात येऊ लागली आहे. त्यातुनच वैयक्तीक टीकाटिप्पणी करण्यास सुरूवात केली आहे. राज्यात शिवसेनेमुळेचे भाजपचा विस्तार झाला असून सत्ता आल्यावर भाजपने शिवसेनेला वाईट वागणूक दिली. याचे साक्षीदार शिवसैनिक आहेत ते भाजपच्या खोट्या प्रसाराला भुलणार नाहीत असंही ते म्हणालेत.
गुढी पाडव्याला मनसेचे मुबंईत विराट शक्तिप्रदर्शन; महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे रणशिंग फुंकणार
खरंतर कोल्हापूरची पोटनिवडणुक बिनविरोध करायला हवी होती. पंरतु यातून भाजपच्या संस्कारी राजकारणाचे दर्शन घडले असते. परंतु सुडबुद्धीने राजकारण म्हणून राजकारण करत पोटनिवडणुक लादली असल्याने जनता आता काॅंग्रेसच्या मागे आहे. 50 वर्षातील काॅंग्रेसचं कार्य आणि पाच वर्षातलं भाजपलं काम यावर चंद्रकांत पाटील चर्चा करायला तयार आहेत का ? असं आवाहन देखील त्यांनी दिलं आहे.
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण; पुणे पोलीस उपायुक्त पंकड डहाणे यांची कसुन चौकशी
उत्तरेत विधानसभा पोटनिवडणुकीत अस्वस्थ शिवसैनिकांना आपल्याला हवं ते करण्याची संधी आहे. ही संधी गेली तर काॅंग्रेस कायमची तुमच्या मानगुटीवर बसेल. बंटी पाटील हा माणसं खाणारा माणुस आहे, असं खळबळजनक वक्तव्य देखील चंद्रकांत पाटलांनी केलं. तसेच सावध रहा. उद्या संजय राऊत आम्ही आमच्या घरचं पाहुन घेऊ म्हणतील. तुमच्या घरी काय सुरू आहे हे रोज टीव्ही सुरू केल्यावर दिसतंय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
Read also:
- “बंटी पाटील हा माणसं खाणारा माणुस”; चंद्रकांत पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
- आयुक्त कैलाश जाधवांच्या बदलीचे नक्की कारण काय? नाशिक पालिकेत रमेश पवार यांची नियुक्ती
- पुणे स्थायी समिती अध्यक्ष अधिकार वाद; महापालिकेच्या विरोधात हेमंत रासने थेट न्यायालयात
- “सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडणार”; किरीट सोमय्यांचा एल्गार
- राणें पाठोपाठ मोहित कंबोज निशाण्यावर; मुंबई महानगरपालिकेडून राहत्या सोसायटीमध्ये झाडाझडती