औरंगाबाद : शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांत काल, पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात विसंवाद पाहायला मिळाला. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात हा विसंवाद पाहायला मिळाला असून, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात हा विसंवाद नाट्य घडले.
‘साहेब शिवसेना वाचवा, माझ्या मोठ्या साहेबांचा शिवसैनिक वाचवा’ कट्टर शिवसैनिकाने फोडला टाहो
खैरे खासदार असताना, त्यांच्या विकास निधीतून शहरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळा साकारण्यात आला. त्या पुतळ्याचा अनावरण सोहळा शहरात पार पाडला. या कार्यक्रमाला दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी, कार्यक्रमाला उशीर होत असल्याने, देसाई सत्कारला नकार देत होते, मात्र खैरेंनी आपलेच घोडे पुढे दामटले आणि त्यामुळे नाराज देसाई खैरेंवर चिडले. त्यामुळे, यावरून काल दोघांमध्ये विसंवाद पाहायला मिळाला.
मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री करणार समुद्राचंही पाणी गोड, निर्णयाचं केलं थेट इस्त्रायलनं कौतुक
तसेच, देसाईंकडून खैरे यांचा सत्कार होत असताना, खैरेंनी नागरिकांकडे पाठ केली, यावरून देखील देसाईंनी खैरेंना चांगलंच सुनावलं. त्यामुळे, औरंगाबाद शहरात काल दिवसभर याच वादाची चर्चा होती. खासदार असताना खैरेंच्या विकास निधीतले ४० लाख रुपये, या पुतळ्यासाठी दिले गेले होते. या निधीचा, आपल्या भाषणात सुभाष देसाई यांनी आवर्जून उल्लेख केला. एकीकडे हे नाराजीनाट्य घडत असताना, दुसरीकडे मंचावर मात्र भाषणात, देसाईंनी खैरे यांचं कौतुक केलं.
मुख्यमंत्र्यांना मिळाला अजून एका मंत्र्याकडून लेटरबॉम्ब, केला काँग्रेस आमदारावर गंभीर आरोप
दरम्यान, या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावं, ही खैरेंची इच्छा आणि औरंगाबादच्या तमाम शिवसैनिकांची इच्छा होती. मात्र, महामारी काळात जमाव करणे, योग्य नसल्याने मुख्यमंत्र्यांनी देसाई यांना, खैरेंच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन होऊद्यात अशी सूचना केली, भाषणात असेही स्पष्टीकरण देसाई यांनी दिले. त्यावर खैरेंनी हात जोडत कृतज्ञता व्यक्त केली.
Read Also :
- “वडेट्टीवार फन्टूस औलाद, त्यांनी आमच्या जिल्ह्यात येऊन दाखवावं”; भाजप आमदाराचे जाहीर सभेत आव्हान
- तीन पक्ष आपापसात भांडतायंत का? हो तीन पक्ष भांडतायंत अन् जनतेला त्रास देतायं
- मोठी बातमी! अखेर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार शुल्क कपातीचा दिलासा!
- “अनिल देशमुखांना होणार अटक? ईडीला मिळाले सर्व पुरावे” याचिकाकर्त्या वकिलाने केला दावा
- आंदोलकांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला