नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात पुन्हा एकदा वांदे होण्याची शक्यताय. त्याला कारणही अर्थातच बहुचर्चित डीपीसी म्हणजेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीचंय. कांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निधी वर्ग करू नका, असं पत्र लिहिलंय.
मुलींमुळे मुलं बेरोजगार होतील; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे खळबळजन वक्तव्य
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात आडवा विस्तू जात नाहीय. त्याचं कारण अर्थातच नांदगाव मतदारसंघ. गेल्याच आठवड्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी नांदगावमध्ये जात आमदार कांदेंना बळ दिलं. इतकंच नाही, तर नांदगावचा नाद करायचा नाही, असा इशारा थेट पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिला. त्यामुळंच आता पुन्हा एकदा आमदार कांदे आक्रमक झालेत. त्यांनी पुन्हा भुजबळांशी पंगा घेण्याचं ठरवलेलं दिसतंय. कारण त्यांनी नुकतंच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना एक पत्र दिलंय. त्यात डीपीसी निधीचं प्रकरण वादग्रस्त आहे. त्यामुळं हा निधी वर्ग करू नका. अन्यथा पोलिसांत तक्रार करत आत्मदहन करू, असा इशारा दिलाय.
एसटी चालकाची आत्महत्या; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा
नांदगाव मतदार संघातील 200 कोटींच्या निधीचं हे प्रकरणय. यासाठी येत्या 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक होण्याची शक्यताय. त्यात या निधीबाबत काही निर्णय होऊ शकतो. त्यामुळं त्यापूर्वीच आमदार सुहास कांदे आक्रमक झालेत. या वादग्रस्त निधीप्रकरणी आपण न्यायालयात गेलो आहोत. त्यामुळं त्यावर कुठलाही निर्णय घेऊ नये, असा इशाराच त्यांनी दिलाय.
गुन्हेगारीवरून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय चिखलफेक; गुंडगिरीत सहभागाचा महापौरांचा आरोप
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप करत पालकमंत्री छगन भुजबळांविरोधात याचिका दाखल केलीय. विशेष म्हणजे ही याचिका मागे घ्यावी म्हणून आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे कांदे यांनी म्हटलं होतं. मात्र, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले होते.
Read Also :
- तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याने कमावलेल्या उत्पन्नातून एसटी चालेल; नारायण राणेंचा अनिल परबांवर घणाघात
- छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे नाशिकमध्ये एकाच मंचावर येणार; काय आहे नेमकं कारण…वाचा…
- अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर, मन्नतवर दिवाळी; राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी थंडावणार?
- पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणवीसांचा पोपट चिट्ठ्या काढतो; नवाब मलिकांचा पटलवार
- अकोल्यात वंचितच्या सत्तेला धक्का; दोन्ही सभापतीपदांवर महाविकास आघाडीचा विजय; भाजपचीही साथ