मुंबई : राज्यभरातील जिल्हा बॅंकांच्या निवडणूकांनंतर आता चार महानगरपालिकांच्या रिक्तपदासाठी पोटनिवडणूका होणार आहेत. धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी पुढील महिन्यात 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी येथे दिली.
मुख्यमंत्रिपदाची तात्पुरते सूत्रे कुणाच्या हाती? अजित पवार की एकनाथ शिंदे?
या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभुमीवर संबंधित प्रभागात आजपासून (24 नोव्हेंबर) आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत ही आचारसंहिता अंमलात राहणार असल्याचंही आयुक्त मदान यांनी सांगितलं आहे. 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. तर 5 डिसेंबरला शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. 7 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. 9 डिसेंबर 2021 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 10 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक चिन्हे नेमून दिली जातील. 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 22 डिसेंबर 2021 रोजी होईल.
देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब?
पोटनिवडणूक होत असलेली महानगरपालिकानिहाय रिक्तपदे : धुळे- 5ब, अहमदनगर- 9क, नांदेड वाघाळा- 13अ आणि सांगली मिरज कुपवाड- 16अ, … दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील आता विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविता येणार असल्याची माहिती मदान यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत उमेदवार, मतदार, राजकीय पक्ष आणि निवडणूक यंत्रणेला माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ट्रू-व्होटर मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदारांना मतदार यादीतील आपले नाव शोधता येते. याचबरोबर या ॲपमध्ये आता मतदार नोंदणीही करता येणार आहे.
Read Also :
- आागामी महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार; नाना पटोलेंची घोषणा
- पुण्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस; भाजपच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा
- ‘तुम्हीपण तुटेपर्यंत ताणू नका राजांनो’; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
- रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुरेश लाड यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
- शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती – शरद पवार