पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आले असताना महाविकास आघाडीतील धुसफूस काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता तर काँग्रेसने थेट राष्ट्रवादीलाच आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे या वादात आणखी एक ठिणगी पडल्याच चित्र दिसत आहे.
पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील – संजय राऊत
पुण्यात महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार? याचं उत्तर आता मिळणं, अशक्य झालं आहे. कारण दिवसेंदिवस महाविकास आघाडीत वादाच्या ठिणग्या पडत आहेत. PMRDAच्या निवडणुकीचा वाद संपत नाही, तोच स्मार्ट सिग्नल व्यवस्थेला सिग्नल व्यवस्थेसाठी 55 कोटी रुपये देण्याच्या निर्णयाला राष्ट्रवादीने भाजपला दिलेला पाठिंबा काँग्रेसला चांगलाच खटकला आहे. म्हणूनच काँग्रेसने राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करा, असा सल्ला दिला आहे.
पवारसाहेब तुमच्यासाठी जीव देईन, पण मला माफ करा; शशिकांत शिंदेंनी मागितली माफी
PMRDA नियोजन समिती निवडणुकीत संख्याबळ नसतानाही काँग्रेसने आपला उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीत फूट पडली होती. परिणामी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी-सेनेचे नगरसेवक निवडून आले. यात आघाडी धर्म पाळला नसल्याचा आरोप राष्ट्रवादीने काँग्रेसवर केला होता. त्यातच आता स्मार्ट सिग्नल व्यवस्थेसाठी महापालिकेकडून स्मार्ट सिटीला 55 कोटी रुपये देण्याचा निर्णय भाजपाने घेतला. या भाजपच्या निर्णयाला राष्ट्रवादीने साथ दिली आणि यावरूनच वादाची नवीन ठिणगी पडली आहे.
महाविकास आघाडी सरकारला पाटलाच्या नाही तर खानाच्या पोराची चिंता; नितेश राणेंची सडकून टीका
पुण्यात भाजपचं मोठे संख्याबळ आहे. असं असताना भाजपला रोखायचं असेल तर महाविकास आघाडीत एकजूट असणं आवश्यक आहे, हे सांगायला कोण्या राजकीय विश्लेषकाचीही गरज नाही. मात्र तसं होताना दिसत नाही. म्हणूनच महाविकास आघाडीची धुसफूस भाजपच्या पथ्यावर पडणार, ही चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
Read Also :
- ‘तुम्हीपण तुटेपर्यंत ताणू नका राजांनो’; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
- रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुरेश लाड यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
- शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती – शरद पवार
- देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब?
- मुख्यमंत्रिपदाची तात्पुरते सूत्रे कुणाच्या हाती? अजित पवार की एकनाथ शिंदे?