मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या असतानाच आज मोठी घडामोड घडली. काही वेळेपूर्वीच भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी पोहचले आहेत. ही भेट कौटुंबिक असल्याचे म्हटले जात असले तरी दोन राजकीय नेते भेटत असल्याने चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे यांचे नवे घर बघण्यासाठी फडणवीस शिवतीर्थावर आले असल्याची माहिती पुढे आली आहे. फडणवीस यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीसही आल्या आहेत. राज ठाकरे आणि शालिनी ठाकरे यांनी दोघांचेही स्वागत केले. सध्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
दोन्ही नेत्यांची महाराष्ट्रातील राजकारणात मोठी भूमिका असते, त्यामुळे राजकीय चर्चाही रंगल्या आहेत. कारण, गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंची हिंदूत्वाच्या संदर्भात घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. यासोबतच मनसे आणि भाजप यांची आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकांत युती होण्याचीही गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. भाजपा आणि मनसे यांच्यामध्ये युती होणार यावर ही भेट म्हणजे शिक्कामोर्तब असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याची चर्चा ?
दरम्यान, राज ठाकरे हे शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी राहायला आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत त्यांच्या घरी सपत्नीक आले होते. यावेळी राऊत यांनी राज यांना कन्येच्या लग्नाचं निमंत्रणही दिलं. राऊत हे राज यांच्या घरी सुमारे अर्धा तास होते. या दोन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पाही झाल्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही राज यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर आज फडणवीसांनी राज यांच्या घरी भेट दिल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Read Also :
- मुख्यमंत्रिपदाची तात्पुरते सूत्रे कुणाच्या हाती? अजित पवार की एकनाथ शिंदे?
- महाविकास आघाडी सरकारला पाटलाच्या नाही तर खानाच्या पोराची चिंता; नितेश राणेंची सडकून टीका
- मोठी बातमी: राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होणार, राजेश टोपेंची माहिती
- ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; नाना पटोले घेणार मंत्रिपदाची शपथ?
- आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं- सदाभाऊ खोत