पुणे : पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. आपल्याच पक्षाचे नेते आपल्याला त्रास देत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काही दिवसांपासून राज्यात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे प्रकरण चांगलेच गाजत आहे. राज्यात सुरू असलेल्या वानखेडे प्रकरणात रूपाली ठोंबरे यांनी एक पोस्ट केली होती. या पोस्टमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
आगीत तेल ओतण्याचे काम करु नये; संजय राऊतांच्या फडणवीसांना कानपिचक्या
समीर वानखेडे प्रकरणात केलेल्या पोस्टवर रूपाली ठोंबरे यांनी स्पष्टीकरण दिले आहेत. एक वकील म्हणून वैयक्तिकरित्या मी ती पोस्ट केली होती. तसेच कोणत्याही मीडियाला ते दिलेले नाही. त्याचबरोबर पालकमंत्री अजित पवार यांच्याशी माझी भेट झाली. मात्र, ती भेट फक्त कामांसाठी होती. त्याचा अर्थ मी मनसे सोडणार असा होत नाही. पण पक्षातील लोकांनी असाच त्रास दिला तर पक्ष सोडावा लागेल, असे सुचक विधान ठोंबरेंनी केले आहे.
आमदारकीचे तिकीट कापले तेव्हाही पक्ष सोडला नाही. माझ्यासोबत पक्षातील लोकांनी राजकारण केले, रुपालीचे राजकारणातून हकालपट्टी कशी करायची, याचे काही जण सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्याचे सर्व रेकाॅर्ड माझ्याकडे आहेत. मनसेतील काही रिकामटेकड्या मंडळींना मी पक्ष सोडून जावे, असे वाटत आहे, असा घणाघात ठोंबरे यांनी केला आहे.
कोनशिलावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याच नावं चुकलं; अजित पवारांनी चक्क डोक्यालाच हात लावला
रुपाली ठोंबरे बोलताना म्हणाल्या की, “मी १४ वर्षांपासून मनसेत फक्त राज ठाकरे यांच्याकडे बघून काम करते. पक्षातील लोकांनी असाच त्रास दिला तर मला पर्याय शोधावा लागेल.” रुपाली यांनी पक्ष सोडला तर हा मनसेला मोठा धक्का बसेल, अशी चर्चा सध्या पुण्यात सुरू आहेत.
Read Also :
- ‘ओह माय गॉड! क्रांती जी’ म्हणत मलिकांनी क्रांती रेडेकरांचे चॅट केले व्हायरल; चॅटमध्ये होते ‘हे’ गुपित
- सरकारचं मंत्रालय बंद, दुकानदारी मात्र सुरू, महत्त्वाचे मंत्रीच भ्रष्टाचाराने बरबटलेतं – पंकजा मुंडे
- नाचता येईना, अंगण वाकडं’ अशी ठाकरे सरकारची अवस्था झाली – प्रीतम मुंडे
- शशिकांत शिंदेचा गेम करणाऱ्यांचा निषेध; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील कार्यालय फोडले
- संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला; ST संपाबाबत चर्चा?