अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा नीटनेटकेपणा हा सर्वानाच परिचित आहे. ते ज्या कार्यक्रमात जातात तिथे या गोष्टींची दक्षता घेण्यात येते. मात्र जर काही कमी-जास्त झाले तर ते भर कार्यक्रमात बोलतात असाच एक प्रसंग पुन्हा एकदा सर्वांच्या समोर आला आहे. पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याचा जिर्णोद्धाराचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी, जिर्णोद्धार वाड्याच्या कोनशिलेवरील नाव पाहून त्यांनी एकदम भन्नाट रिॲक्शन दिले.
कबूल है, कबूल है…. मलिकांनी वानखेडेंचा टोपी घातलेला फोटो शेअर करत माजवली पुन्हा खळबळ
अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्या अभंग गाथेच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन संपन्न सोहळा पार पडला. येथील कार्यक्रमात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच चूक पाहिली अन् मजेशीर रिॲक्शन दिली. हसन मुश्रिफ यांच्या नावातील चूक पाहून कपाळावरच हात मारला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, निलेश लंके, चैतन्य महाराज देगलुरकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित होते.
नाराज विनोद तावडेंचं भारतीय जनता पक्षाकडून थेट प्रमोशन; मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी
संत निळोबाराय यांचे निवासस्थान असलेला वाडा आणि मंदिर यांच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अजित पवारांनी उद्घाटन केल्यानंतर कोनशिलेवरील नावात असलेली चूक लक्षात आणून दिली. कोनशिलेवर अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफऐवजी ‘मुस्त्रीफ’ अशी शब्दरचना करण्यात आली होती. हे पाहिल्यानंतर, अजित पवारांनी कपाळावर हात मारला. दरम्यान, मुळा धरणाच्या बॅक वॉटरमधून पारनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येत असून या योजनेचे विद्युत देयक नियमितपणे भरावे असे प्रतिपादन अजित पवार यांनी यावेळी केले.
Read Also :
- प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड आता निश्चित; भाजपचा उमेदवारी अर्ज मागे
- ST संपाच्या तोडग्यासाठी आता पवारांचा पुढाकार; परब आणि अजित पवारांसोबत गुप्त बैठक
- ट्विट का जवाब ट्विटसे: मलिकांच्या ट्विटला वानखेडेंचे हिंदू संस्कृतीचे पालन करणारे फोटो टाकत सणसणीत उत्तर
- कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपला ‘जोर का झटका’; सहा नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश
- माजी खासदार राजू शेट्टी, मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या पाठींब्याने बंटी पाटलांचे पारडे जड