मुंबई : राज्यात नुकतीच विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरच्या जागेसाठी सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे दबंग नेते सतेज उर्फ बंटी पाटील हे महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत. त्यांच्या विजयासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कंबर कसली आहे.
रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला यश; केंद्र आणि राज्य सरकारने दिले भेटीचे निमंत्रण
दुसरीकडे माजी आमदार अमल महाडिक हे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विजयासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. अमल महाडिक यांना आमदार प्रकाश आवडे आणि जनसुराज्य पक्षाचे नेते आणि आमदार विनय कोरे यांचा देखील पाठींबा मिळाला आहे. सध्या तरी प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी गेल्या ६ महिन्यांपासून या निवडणुकीची तयारी सुरु केली होती. त्यांनी सर्वपक्षीय आमदारांच्या भेटी गाठी देखील घेतल्या आहेत. दुसरीकडे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी देखील अनेकांच्या भेटी गाठी घेऊन निवडणुकीत रंगत आणली आहे.
अजित पवार आणि अण्णा हजारे येणार एकाच व्यासपीठावर; राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या
आता सध्या तरी बंटी पाटलांचे पारडे काहीसे जड झाले आहे. ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत महादेवराव महाडिक यांना पाठिंबा देणारे माजी खासदार राजू शेट्टी यांनी विधानपरिषदेसाठी सतेज पाटील यांना पाठिंबा दिला. पाटील यांच्या प्रचाराच्या मेळाव्यात हजर राहून सतेज पाटील यांचा विजयाबाबत विश्वास व्यक्त केला.
‘त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो’, चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर पलटवार
एवढंच नाही तर आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा संपूर्ण यड्रावकर गट महाविकास आघाडीचे उमेदवार तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. त्यामुळे शेट्टी आणि यड्रावकरांच्या पाठींब्याने बंटी पाटलांचे पारडे काहीसे जड झाले आहे. आता महादेवराव महाडिक काय भूमिका घेतात आणि कसे या घडामोडींना सामोरे जातात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या निवडणुकीत लक्ष घातले आहे.
Read Also :
- नाराज विनोद तावडेंचं भारतीय जनता पक्षाकडून थेट प्रमोशन; मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी
- कबूल है, कबूल है…. मलिकांनी वानखेडेंचा टोपी घातलेला फोटो शेअर करत माजवली पुन्हा खळबळ
- पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटरवर झाले ‘लखपती’; सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असणारे महापौर
- रत्नागिरीत राणेंच्या पॅनलचा सुपडा साफ; जिल्हा बँकेवर शिवसेनेच्या सामंतांचा वरचष्मा
- कृषी कायदे रद्द करून मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवला; देवेंद्र फडणवीसांची स्तुतीसुमने