मुंबई : २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी भारतीय जनता पक्षाकडून अनेक निष्ठावंतांना डावलण्यात आलं होतं. यामध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतरही काही आमदारांचा समावेश होता. आता पक्षाकडून या सर्व निष्ठावंतांना न्याय देण्यात येत आहे.
‘प्यार मे इजहार और राजनिती मे प्रचार’; मलिकांचा अजित पवारांना राजकीय सल्ला
माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले आहेत. विधानपरिषदेला संधी न दिल्याने तावडे काहीसे नाराज झाले होते मात्र भाजपने आता त्यांना मोठी संधी देऊ केली आहे.
रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला यश; केंद्र आणि राज्य सरकारने दिले भेटीचे निमंत्रण
भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. याआधी तावडे राष्ट्रीय चिटणीस पदावर कार्यरत होते. आता राष्ट्रीय सरचिटणीस पदावर त्यांची नियुक्ती झाल्याने पक्षाने त्यांचे पुनर्वसन केले आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता तावडे हे पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ चे समन्वयक झाले आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. राज्याच्या राजकारणापासून काही काळासाठी दूर असलेले तावडे आता पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सक्रिय होणार आहेत.
अजित पवार आणि अण्णा हजारे येणार एकाच व्यासपीठावर; राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या
विनोद तावडे यांनी यापूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, भाजपच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस, मुंबई भाजप अध्यक्ष, १२व्या आणि १३व्या लोकसभा निवडणुकीसाठी समन्वय समितीचे प्रमुख सदस्यपद भूषविले आहेत. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी परिपत्रक काढून घोषणा केली होती. यामध्ये पाच जणांना संधी देण्यात आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे यांना संधी देण्यात आली आहे.
Read Also :
- कबूल है, कबूल है…. मलिकांनी वानखेडेंचा टोपी घातलेला फोटो शेअर करत माजवली पुन्हा खळबळ
- पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटरवर झाले ‘लखपती’; सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असणारे महापौर
- रत्नागिरीत राणेंच्या पॅनलचा सुपडा साफ; जिल्हा बँकेवर शिवसेनेच्या सामंतांचा वरचष्मा
- कृषी कायदे रद्द करून मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवला; देवेंद्र फडणवीसांची स्तुतीसुमने
- ‘त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो’, चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर पलटवार