मुंबई – विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. विलिनीकरण अशक्य असल्याचे सत्ताधारी नेत्यांकडून अप्रत्यक्षपणे सांगितले जात आहे. मात्र, आता नवी माहिती समोर आली आहे. चिघळलेल्या एसटी संपात शिष्टाई करण्यासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
संपाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात महत्त्वाची बैठक सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीदेखील बैठकीला उपस्थिती आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार? याची उत्सुकता लागली आहे.
वेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांना भाजपने दाखवला कात्रजचा घाट
विलिनीकरणाच्या मागणीसाठी जवळपास दहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह आझाद मैदानावर ठिय्या दिला आहे. याच पार्श्वभूमीवर वरळीतील एका हॉटेलमध्ये ही बैठक सुरू असून त्यात संपाच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारकडून समिती नेमण्यात आली आहे. समितीच्या अहवालानुसार निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच कायदे रद्द करण्याची उपरती; राजू शेट्टींचा लेख व्हायरल
काल मनमाड, घोटीच्या कर्मचाऱ्यांनाही अडवण्यात आले. काल कर्मचाऱ्यांनी टॉर्च लावून आंदोलन केले. हा भडका पाहता आता शरद पवारांनी हे आंदोलन सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यातून काही मार्ग निघणार का, याची उत्सुकता आहे.
Read Also :
- ट्विट का जवाब ट्विटसे: मलिकांच्या ट्विटला वानखेडेंचे हिंदू संस्कृतीचे पालन करणारे फोटो टाकत सणसणीत उत्तर
- कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपला ‘जोर का झटका’; सहा नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश
- माजी खासदार राजू शेट्टी, मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या पाठींब्याने बंटी पाटलांचे पारडे जड
- नाराज विनोद तावडेंचं भारतीय जनता पक्षाकडून थेट प्रमोशन; मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी
- कबूल है, कबूल है…. मलिकांनी वानखेडेंचा टोपी घातलेला फोटो शेअर करत माजवली पुन्हा खळबळ