मुंबई : काल (मंगळवारी) रात्री झालेल्या बैठकीत राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत कोरोना टास्क फोर्सकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. शाळा सुरु करण्याबाबत इतर बाबींची पूर्तता राज्य शासनाने केल्यास शाळा सुरु करण्यास काहीच हरकत नसल्याचे कोरोना टास्क फोर्सचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीला झटका : आमदार बाबाजानी दुर्रानींनी दिला आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
जेव्हा लहान मुलांसाठी लस उपलब्ध करून दिली जाईल, तेव्हा लहान मुलांचे लसीकरण सुरु होईल. पण त्यापूर्वी शाळा सुरु करण्यास हरकत नसल्याचेही टास्क फोर्समधील डॉक्टरांचे म्हणणे आहे. जरी कोरोना टास्क फोर्सने हिरवा कंदील दिला असला, तरी कॅबिनेट बैठकीत सोबतच मुख्यमंत्र्यांसोबत शाळा सुरु करण्याचा निर्णय बाबत चर्चा केली जाणार आणि त्यानंतर राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
नितेश राणेंची एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत पुढील दहा दिवसांमध्ये सर्वांशी चर्चा करून शिक्षण विभाग निर्णय घेऊ शकतो. शहरी भागांत टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करायच्या किंवा पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करायच्या याबाबत शिक्षण विभागाने आपली तयारी बघून आणि इतर बाबींची पूर्तता बघून निर्णय घ्यावा, असेही टास्क फोर्सने स्पष्ट केले आहे.
शशिकांत शिंदेचा गेम करणाऱ्यांचा निषेध; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील कार्यालय फोडले
राज्यातील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणामध्ये आल्याचे दिसत असल्यामुळे राज्य सरकारने अनेक गोष्टी सुरु केल्या आहेत. त्यानंतर आता मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासन अनुकूल आहे. पण लहान मुलांच्या लसीकरणानंतरच शाळा सुरु कराव्यात असा कोरोना टास्क फोर्सचा आग्रह आहे. मुंबईमध्ये पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याकरिता मुंबई महापालिकेने तयारी दर्शवली आहे. तसे राज्य सरकारलाही कळवण्यात आले आहे. शाळा सुरु झाल्यानंतर कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढलीच, तरी महापालिका प्रशासन पूर्ण सक्षम असल्याचे महापालिकेने राज्य सरकारला कळवले आहे.
एसटी संप आज मिटणार का? ११ वाजता राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये होणार महत्वाची बैठक
राज्यातील कोरोना अनलॉकनंतर सार्वजनिक ठिकाणी, गर्दीत लहान मुलांचा वावर वाढल्यानंतरही लहान मुलांमधील कोरोना केसेस नगण्य असल्याचे दिसून येत असल्यामुळे बगिचे, क्रिडांगणे ,बाजार याठिकाणी लहान मुलांचा वावर वाढला असताना शाळा सुरु करण्यास हरकत नसल्याचे महापालिकेचे मत आहे. आता लहान मुलांच्या वयोगटासाठी लसीकरणाची सुरुवात करण्याच्या हालचाली राज्यात सुरु झाल्या आहेत. तीन लाख मुलांच्या लसीकरणाची तयारी मुंबई महापालिकेनेही केली असून राज्य सरकार आणि कोविड टास्क फोर्सची सूचना येताच या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यात आता शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात येत असून त्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. पण शाळा सुरु करण्यापूर्वी या मुलांचे लसीकरण करण्यात यावे, यासाठी कोरोना टास्क फोर्स आग्रही आहे. पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशा दोन टप्प्यांमध्ये शाळा सुरु करण्यासंबंधी राज्य सरकारच्या सूचना येण्याची शक्यता आहे.
Read Also :
- ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; नाना पटोले घेणार मंत्रिपदाची शपथ?
- आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं- सदाभाऊ खोत
- राज्य सरकारसोबत चर्चेला जाणाऱ्या पडळकरांना आणि खोत यांच्या शिष्टमंडळाला कर्मचाऱ्यांनी रोखलं
- मनसे सोडणार असल्याच्या अफवा पक्षातील विरोधकांनीच रंगवल्या; रुपाली ठोंबरेनी सोडले मौन
- साताऱ्याच्या निकालाने राष्ट्रवादीत फुटीची चिन्हे; शशिकांत शिंदेंचे थेट संकेत