मुंबई : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या १५ दिवसांपासून संप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विलगीकरण करा अथवा संप मागे घेणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी आणि संघटनांनी घेतली आहे. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी बैठकांचा आणि चर्चांचा सपाटा लावला आहे.
पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याची चर्चा ?
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला एसटीच्या संघटनांसोबतच भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठींबा दर्शविला आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हे देखील अनेक दिवसांपासून आंदोलन कर्त्यांसोबत ठाण मांडून बसले आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांची भेट घेतली होती आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत केली होती. आता परिवहनमंत्री अनिल परब यांनी एक पाऊल पुढे टाकत संपकरी कर्मचाऱ्यांना बैठकीसाठी बोलविले होते. संपकरी कर्मचाऱ्यांसोबत भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील बैठकीला हजेरी लावली होती.
शरद पवार कधीच तोडगा काढत नाहीत, नुस्त खेळवत ठेवतात; नारायण राणेंचा घणाघात
महाराष्ट्र राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे अंतरिम वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव या बैठकीत देण्यात आला आहे. त्यावर एसटीच्या संपकऱ्यांच्या प्रतिनिधींनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र यावर आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतरच संप मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
अनिल परबांच्या घराबाहेर जनशक्तीच्या कार्यकर्त्यांचा राडा; शाई फेकण्याचा प्रयत्न
आज ११ वाजता एक महत्वाची बैठक होणार आहे. २० डिसेंबरपर्यंत राज्य सरकार उच्च न्यायालयाला याबाबतचा अहवाल देणार आहे. एसटीच्या विलीनीकरणाची शिफारस अहवालात असेल, तर सरकार तो अहवाल तसाच्या तसा स्वीकारणार आहे. मात्र जर असं काही नसेल तर अंतरिम वेतनवाढ कायम करून, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेळेत वेतन देण्याची तयारी सरकारी पक्षाची आहे. या सर्व पर्यायांवर अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल असं मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल व्यक्त केलं आहे.
Read Also :
- निलेश लंके लावणार अवघ्या 1 रुपयात 101 शाही विवाह; पवार कुटुंबीय करणार कन्यादान
- साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक प्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा? शरद पवारांच्या परबांना महत्वाच्या सूचना
- “महाराष्ट्र केंद्रशासित करा आणि केंद्राला चालवायला द्या”; प्रीतम मुंडे कडाडल्या
- पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील – संजय राऊत