मुंबई : शिवसेना अपात्र आमदार प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानावर बैठक पार पडली. तर आज दुपारी तीन वाजता शिंदे गटातील सर्वच आमदारांना शिवसेना भवनात येण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना प्रंचड वेग आला आहे. यातच आता निकालाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…शरद मोहोळ ह’त्या प्रकरणात मोठी बातमी समोर, मोहोळ ह’त्या प्रकरणात आता गुन्हे शाखेची एंन्ट्री
पक्ष आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे. त्यामुळे निकाल आमच्या बाजूनेच लागणार आहे. पक्ष आमच्याकडे असल्याने आम्हीच खरी शिवसेना असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आमचं सरकार बहुमताचं असून काहीजण अकलेचे तारे तोडत आहेत. यातच आम्ही घटनाबाह्य नाही अस म्हणत ठाकरे गटच घटनाबाह्य असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…निकालाच्या आधी नार्वेकरांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, राहुल नार्वेकरांनी दिलं भेटीचं कारण, म्हणाले…
दरम्यान, राहुल नार्वेकरांच्या भेटीवर ठाकरेंनी टिका केली होती. त्यावरही एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. आम्ही लपूनछपून बैठका करत नाही, दिवसाढवळ्या भेटलो. ठाकरे गटाला त्यांचा पराभव दिसू लागला म्हणून सरकार बदलेल. मुख्यमंत्री बदलेल अशी भाकितं वर्तवली जात होती. असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर एकनाथ शिंदे अपात्र ठरणार,” राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा…अजितदादांनी आखली मोठी रणनिती, अमोल कोल्हेंच्या विरोधात पार्थ पवार रिंगणात, आढळराव पाटलांचं काय होणार ?
हेही वाचा…“तर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार,” माजी मुख्यमंत्र्यांनी केला मोठा दावा
हेही वाचा“सुनील केदारांची आमदारकी त्यात तत्परतेने पुन्हा बहाल करावी, ” विरोधकांची मागणी
हेही वाचा…पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये २० जण इच्छुक ; आजी माजी आमदार, नगरसेवकांचा समावेश