कराड: सांगली आणि सातारा जिल्हाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गट,डॉ. इंद्रजित मोहिते गट आणि अविनाश मोहिते गट यांच्यात कृष्णा कारखान्यासाठी मुख्य लढत होणार आहे. दोन्ही मोहितेंचे मनोमिलन आता अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि तीनही पॅनलकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे.
कृष्णा सहकारी साखर कारखान्यात दुरंगी लढत होणार की तिरंगी लढत होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. रयत पॅनलचे डॉ. इंद्रजित मोहिते आणि संस्थापक पॅनलचे अविनाश मोहिते यांच्यात मनोमिलन करण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्व्जीत कदम यांनी विशेष प्रयत्न केले होते. मात्र जागा वाटपांवरून गेल्या महिन्यात झालेल्या ८ ते १० बैठकांमध्ये देखील अजूनपर्यंत निर्णय न झाल्याने आता चर्चेचे गुऱ्हाळ संपुष्टात आल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आता आपले हात वर केले आहेत आणि ते यामधून बाहेर पडले आहेत.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या जागा मिळण्यासाठी काही अटी दोन्ही पॅनलकडून पुढे करण्यात आल्या होत्या. यामध्ये महत्वाचे म्हणजे जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत सुटला नसल्याची माहिती समोर आली आहे. माही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबात जाहीर केल्यामुळे डॉ. सुरेश भोसले यांचा जयवंतराव भोसले सहकार पॅनल, डॉ इंद्रजित मोहिते यांचा रयत क्रांती पॅनल आणि अविनाश मोहिते यांचा संस्थापक पॅनल यांच्यात जोरदार कांटे की टक्कर होणार आहे हे स्प्ष्ट झाले आहे. दोन्ही पॅनलच्या मनोमिलनच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
हे पण वाचा
कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी भोसले विरुद्ध मोहिते गटात रंगणार कलगीतुरा
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मिळणार दुसरा हप्ता
डॉ. सुरेश भोसले आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात कृष्णा साठी ‘खलबतं’; निवडणुकीचा सस्पेन्स वाढला