पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण राबवला जाणार असल्याची माहिती दिली आहे. देशात भारत बायोटेकची Covaxin आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राजेनेकाची Covishield या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी कोरोना लसीकरणासंदर्भात कार्यक्रमाची माहिती दिली होती.
लसीकरण प्रक्रिया सुरू होण्याआधी राज्य सरकारं आणि प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. पुण्यातील लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटमधून आज कोविशील्ड लसीची पहिली खेप रवाना झाली आहे.
#WATCH | First consignment of Covishield vaccine dispatched from Serum Institute of India's facility in Pune, Maharashtra. pic.twitter.com/QDiwLXka2g
— ANI (@ANI) January 11, 2021
पोलिसांनी सीरम इन्स्टिट्यूटपासून या वाहनाला एअरपोर्टपर्यंत सुरक्षा पुरवली. एकूण 8 विमाने कोविशील्ड लस पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशातील 13 ठिकाणी पोहोचवली जाणार आहे.
काल केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवणे सुरु करण्यात आले आहे.
Read Also :
- सर्वात प्रथम मोदी आणि उद्धव ठाकरेंनी लाईव्ह टिव्हीवर लस घ्यावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी
- ‘आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस, गोड चहा घ्यायचा सोडा’, खोत यांचा शेट्टींना टोला
- ‘तुझी लायकी मातोश्रीचे बिस्कीट चोरायच्या पलीकडे नाही’, राणेंचा विनायक राऊतांवर हल्लाबोल
- आरक्षणाविषयी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, अशोक चव्हाणांची माहिती
- बर्ड फ्लूसंदर्भात गैरसमज व अफवा पसरवू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन