मुंबई : संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष्य लागून राहिलेल्या शिवसेनेच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालायत सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. मात्र या याचिकांवर काही वेळाच युक्तीवाद करण्यात आल्याने ही सुनावणी आणखी लांबणीवर गेली आहे.
शाई फेकणाऱ्यावर जीवे मारण्याचा गुन्हा… राज ठाकरेंनी घेतली ही भूमिका
न्यायालयात ठाकरे गटातील वकिल कपिल सिब्बल यांनी नबाम रबियासारखे प्रकरण असल्याने हा खटला 7 न्यायाधीशांसमोर लढला जावा अशी विनंती केली. त्यावर मुख्य न्यायमुर्तींनी यावर तुम्ही लेखी विनंती सादर करा, त्यानंतर तुमचं म्हणणं ऐकुन घेऊ अशी सुचना केली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद…! वाद चिघळत असतांनाही रोहित पवारांनी गाठलं थेट बेळगाव
नबाव रबिया प्रमाणे विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराबाबत आपण स्वतंत्र्य सुनावणी घेऊ शकता का?असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी केला. त्यावर न्यायमुर्ती आपण या मुद्यावरील सुनावणी सर्वात आधी घेऊयात असंही सिब्बल यांनी युक्तिवाद केला.
“चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस जाहीर, तर बारामतीतून 51 हजारांचे बक्षीस”
दरम्यान, राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार कक्षांचा उहापोह करणाऱ्या या महत्वाच्या खटल्याची सुनावणी येत्या 10 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या याचिकांसंदर्भात कधी निकाल लागणार याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे. याची प्रतिक्षा महाराष्ट्रातील सगळेच जण आतुरतेने करीत आहे.
Read also
- काल दोन ‘दादा’ भिडले अन् आज मंत्रालयाच्या बैठकीत एकमेकांच्याच बाजुलाच बसले
- “आज पुणे, तर उद्या संपुर्ण महाराष्ट्र बंद होईल”, संजय राऊतांचा इशारा
- मोठी बातमी…! शरद पवारांना जीवे ठार मारण्याची धमकी, सिल्व्हर ओकवर धमकीचा फोन
- पुण्यातल्या मोर्चात उदयन राजे सहभागी…! तर मनसे-भाजपच्या नेत्यांनी फिरवली पाठ
- पुण्यात लॉकडाऊन सारखी पुन्हा परिस्थिती..! राजकीय पक्षांकडून पुणे बंदची हाक