अकोला : शहरातील एका गुंडाने एका चौदा वर्षाच्या मुलीचे मुंडन करून तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आरोपीवर कडक करावाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…खासदाराच्या मातोश्रीचं निधन, मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील रूग्णालय गाठून घेतलं अत्यंदर्शन
अकोल्यातील गाव गुंडाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाने स्वाधीकारे दखल घेतली असून याबाबत खदान पोलीस स्टेशन यांचेकडून आत्तापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागविण्यात आला आहे. तसेच पोलीस अधीक्षक अकोला यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.मी स्वतः घटना घडल्यापासून अकोला पोलिस अधीक्षक व तपास अधिकारी यांच्याशी संपर्कात आहे,आरोपीवर कठोर कारवाई करावी यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“दानपेट्या काढल्या तर मंदिरात एकही पुजारी दिसणार नाही”, कुणी केलं ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, सकाळ पासून संबंधित तपास अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कायद्याच्या चौकटीत आरोपीला शिक्षा केली जाणार आहे. महिला आयोगाच्यावतीने पाठपुरावा करीत असतांना आरोपीला अशा पद्धतीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून या शिक्षेचा वचक इतरांवर देखील राहिला पाहिजे. तसेच अशा पद्धीतीच्या घटना घडू नये. असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…आगामी निवडणुकांसाठी भाजपने कसली कंबर, निवडणुक प्रमुखांना फडणवीस देणार मोलाचा संदेश
दरम्यान, एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत मजल जाते हे अतिशय संतापजनक आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे. या गुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. शासनाने त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून त्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
अकोल्यातील गाव गुंडाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाने स्वाधीकारे दखल घेतली असून याबाबत खदान पोलीस स्टेशन यांचेकडून आत्तापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागविण्यात आला आहे. तसेच पोलीस अधीक्षक अकोला यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने कार्यवाही… pic.twitter.com/twl3MiHLd1
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“बावनकुळेंचा जुगार खेळतांना फोटो, तर आदित्य ठाकरेंच्या हातात व्हीस्की”, भाजप अन् ठाकरे गटात रंगलं ट्विटरवार
हेही वाचा…“भाजपच्या बड्या नेत्याने जुगारात ३.५० कोटी उडवले,”? राऊतांनी ट्विट करत ‘या’ नेत्यावर साधला निशाणा
हेही वाचा…“भुजबळांच्या ‘त्या’ भूमिकेला समर्थन नाही,” वडेट्टीवारांचं वक्तव्य, ओबीसी नेत्यांमध्ये दुफळी ?
हेही वाचा…अकोला हादरलं..! मुंडन करून सिगारेटचे चटके देत १४ वर्षीय मुलीवर अत्याचार, कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…ठाकरे गटाच्या ५० ते ६० पदाधिकाऱ्यांना पाठवल्या नोटीसा, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय ?