मुंबई : शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर झालेल्या राड्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देत नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईत पुन्हा नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी नेमकी कुणाची ? निवडणुक आयोगात होणार फैसला, सुनावणीसाठी शरद पवार अन् अजित पवार राहणार उपस्थित
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पुर्वसंध्येला ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवतीर्थावर मोठा राडा झाला. यावेळी ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या प्रकरणी आता पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा…“नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासणं कितपत योग्य”? शरद पवारांवर कायदेशीर कारवाई करणार, जाधवांचा इशारा
दरम्यान, शिवतीर्थावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे. तर ठाकरे गटाने हे आरोप फेटाळून लावत सुरूवात कोणी केली? अशी विचारणा करण्यात आली आहे. यातच हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून पोलिस पुढची तपासणी करीत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…खासदाराच्या मातोश्रीचं निधन, मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील रूग्णालय गाठून घेतलं अत्यंदर्शन
हेही वाचा…“दानपेट्या काढल्या तर मंदिरात एकही पुजारी दिसणार नाही”, कुणी केलं ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य
हेही वाचा…आगामी निवडणुकांसाठी भाजपने कसली कंबर, निवडणुक प्रमुखांना फडणवीस देणार मोलाचा संदेश
हेही वाचा…शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार, मराठा समाजाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
हेही वाचा…“बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्विकारला असता तर…” वडेट्टीवारांचं मोठं विधान, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता