पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दाखवल्यावर कुणबी नोंद असल्याचा दावा नामदेवराव जाधव यांनी केला होता. त्याचा रोष व्यक्त करत आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधवांना पत्रकारांना प्रतिक्रिया देतांनाच काळं फासलं आहे. यावरून नामदेव जाधवांनी आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप केले आहेत.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या, ठाकरे गटातील खासदारांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, केली ‘ही’ मागणी
राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यातच नामदेव जाधव मराठा आरक्षणावरून आपली भूमिका मांडत आहेत. त्यांनी शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला बाहेर काढत शरद पवार हे कुणबी असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यावरून आता पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नामदेव जाधव यांना काळ फासण्यात आलं आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जे करतात ती दडपशाही”, भाजप नेत्याची टिका
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणारच, परंतु त्यासोबत शरद पवार आणि रोहित पवार यांची खासदारकी आणि आमदारकी घालवणार असा इशारा नामदेव जाधव यांनी दिला आहे. यातच नामदेव जाधव घेतलेल्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. प्रत्येक जण आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. यातच नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासणं कितपत योग्य आहे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, भुजबळांच्या वक्तव्यावरही चर्चा
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा नामदेव जाधवांवर हल्ला, हल्ल्याची जबाबदारी ‘या’ नेत्याने स्विकारली
हेही वाचा…नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांबद्दलची भुमिका आली अंगलट
हेही वाचा…नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांबद्दलची भुमिका आली अंगलट
हेही वाचा…“असे गुन्हे माझ्यावर होत असतील तर बाळासाहेबांना याचा अभिमान वाटत असेल”, आदित्य ठाकरे आक्रमक