पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नामदेवराव जाधव यांनी गंभीर आरोप लावले होते. शरद पवार यांच्या दाखल्यावर कुणबी जात असल्याचा उल्लेख आहे असा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. त्यानंतर हा वाद चांगलाच पेटला असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यात नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासलं आहे.
हेही वाचा…“तर प्रत्येक व्यक्तीने विष घेऊन मेलेलं बरं,” जरांगे पाटलांच्या भेटीनंतर उदयन राजेंचं मोठं विधान
शरद पवार हे मराठा नसून कुणबी आहेत. त्यांनी ओबीसी ही जात लावून आरक्षण लाटलं असल्याचा गंभीर आरोप नामदेव जाधव यांनी केला होता. त्यावर आज पुण्यातील पत्रकार भवनात माध्यमांशी बोलत असतांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळ फासलं आहे.
हेही वाचा…“मुंबईकरांचा पाणी होणार महाग, पाणी पट्टीत तब्बल ८ टक्क्यांनी वाढ,” काॅंग्रेसचा प्रचंड विरोध
दरम्यान, माध्यमांशी संवाद साधतांना नामदेव जाधव यांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काळं फासण्यात आलं आहे. यावेळी शरद पवारांच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यातच सुरक्षा रक्षकाने नामदेव जाधव यांना वाचवून तात्काळ गाडीत बसवलं. त्यानंतर नामदेव जाधव यांनी तिथून पळ काढलं.
READ ALSO :
हेही वाचा…“असे गुन्हे माझ्यावर होत असतील तर बाळासाहेबांना याचा अभिमान वाटत असेल”, आदित्य ठाकरे आक्रमक
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या, ठाकरे गटातील खासदारांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…“उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जे करतात ती दडपशाही”, भाजप नेत्याची टिका
हेही वाचा…“संभाजी राजे तुम्ही फक्त एका समाजाचे नाहीत,”,छगन भुजबळांनी संभाजी राजेंना सुनावलं
हेही वाचा…मागासवर्ग आयोगाच्या बैठकीतली सर्वात मोठी बातमी, मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या