नाशिक : संभाजी राजे तुम्ही फक्त एकाच समाजाची बाजू कशी उचलू शकता. तुम्ही राजे शाहू महाराजांचे वशंज आहात. असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी राजे यांनी सवाल केला आहे. संभाजी राजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणासाठी पाठिंबा दर्शविल्यानंतर छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…अंजली दमानिया यांना पोलिसांनी भुजबळांच्या घराबाहेर रोखलं, महिला पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झाली बाचाबाची
नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरीमध्ये छगन भुजबळ यांनी सभा झाली. या सभेत त्यांनी पुन्हा मराठा आरक्षणावर भाष्य केलं . कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. आम्ही मराठा आरक्षणासाठी कधीच विरोध केला नाही. फक्त ते आरक्षण कोणाचेही न काढता देण्यात यावे, असंही भुजबळ म्हणाले.
हेही वाचा…एल्गार सभेनंतर मराठा समाज आक्रमक, भुजबळांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
दरम्यान, काल मंत्री छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची संभाजी राजे यांनी मागणी केली. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे, अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी माजी खासदार संभाजी राजे यांनी केली आहे. त्यामुळे आता दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा वाद पेटत चालला आहे.
हेही वाचा…ओबीसींच्या एल्गार सभेला गैरहजर का ? पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या…
छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसतांना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. अशी टिका देखील संभाजी राजे यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मागासवर्ग आयोगाच्या बैठकीतली सर्वात मोठी बातमी, मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या
हेही वाचा…“तर प्रत्येक व्यक्तीने विष घेऊन मेलेलं बरं,” जरांगे पाटलांच्या भेटीनंतर उदयन राजेंचं मोठं विधान
हेही वाचा…“मुंबईकरांचा पाणी होणार महाग, पाणी पट्टीत तब्बल ८ टक्क्यांनी वाढ,” काॅंग्रेसचा प्रचंड विरोध
हेही वाचा…आदित्य ठाकरेंवर केलेली कारवाई योग्यच, मुंबईत गुन्हा दाखल, भाजप नेत्याने डिवचलं
हेही वाचा…“ओबीसींच्या सभेला पक्षाने पाठवलं नाही,” पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर आता भाजपकडून स्पष्टीकरण