मुंबई : मागच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. परंतु मराठा समाजाचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. त्यावर आता अभ्यास केला जात असून मराठा समाजाला मागास ठरवण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. यातच आज माजी खासदार संभाजी राजे यांनी मागास वर्गीय आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावरून आता राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीतली एक मोठी बातमी समोर आलीय.
हेही वाचा…एल्गार सभेनंतर मराठा समाज आक्रमक, भुजबळांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
राज्य मागासवर्गीय आयोग भोसले समितीचा अभ्यास करणार आहे. मराठा समाजाचं सामाजिक मागालेपण तपासलं जाणार आहे. शैक्षणिक मागासलेपणाची वास्तविक टक्केवारीसुद्धा या सर्व अभ्यासातून तपासली जाईल. आतापर्यंतच्या सर्व समितींच्या अहवालांचा अभ्यास करून त्यामधील ऋुटीसुद्धा शोधल्या जाणार आहेत.
हेही वाचा…ओबीसींच्या एल्गार सभेला गैरहजर का ? पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या…
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण तपासणार आहे. मागासवर्ग आयोग सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाची टक्केवारी शोधणार आहे. त्याचबरोबर नोंदी, अहवाल, जनगणना, या माहितीद्वारे मराठा समाजाच्या लोकसंख्येचं प्रमाण निश्चित केलं जाणार आहे. आतापर्यंत नेमण्यात आलेल्या सर्व समित्यांचा कामाचा आणि त्यांच्या अहवालाचा अभ्यास मागासवर्ग आयोग करणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर प्रत्येक व्यक्तीने विष घेऊन मेलेलं बरं,” जरांगे पाटलांच्या भेटीनंतर उदयन राजेंचं मोठं विधान
हेही वाचा…“मुंबईकरांचा पाणी होणार महाग, पाणी पट्टीत तब्बल ८ टक्क्यांनी वाढ,” काॅंग्रेसचा प्रचंड विरोध
हेही वाचा…आदित्य ठाकरेंवर केलेली कारवाई योग्यच, मुंबईत गुन्हा दाखल, भाजप नेत्याने डिवचलं
हेही वाचा…“ओबीसींच्या सभेला पक्षाने पाठवलं नाही,” पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर आता भाजपकडून स्पष्टीकरण
हेही वाचा…अंजली दमानिया यांना पोलिसांनी भुजबळांच्या घराबाहेर रोखलं, महिला पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झाली बाचाबाची