मुंबई : ओबीसींच्या एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या अंजली दमानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भुजबळांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देणार अशी भूमिका घेतल्यानंतर आता अंजली दमानिया यांना सांताक्रुझ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा…मंत्रिमंडळ बैठकीला २९ पैकी ‘या’ १६ मंत्र्यांची दांडी, राज्याचा कारभार कसा चालणार ?
काल झालेल्या सभेनंतर आज अंजली दमानिया या छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या. मात्र पत्रकार परिषदेपुर्वीच सांताक्रुझ पोलिसांनी अंजनी दमानिया यांना ताब्यात घेतलं आहे. छगन भुजबळांविरोधात दमानिया काहीतरी खुलासा करणार होत्या. त्या भुजबळांच्या घरी जाण्यापुर्वीच पोलिसांनी त्यांना रोखलं. यावेळी अंजली दमानिया आणि महिला पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
हेही वाचा…“आज बाळासाहेब असते तर त्यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं असतं”, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या भावना
दरम्यान, या प्रकरणावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दमानिया यांना खोचक टोला हाणला आहे. अंजली दमानिया ताई आपण ज्या आतताईपणे राजकारण करू पाहत आहात तो केवळ आपला पब्लिसिटी स्टंट आहे. एखाद्या व्यक्तीविरुद्ध इतक्या टोकाचा रोष करण्यामागचे आपले नेमके राजकारण सर्व महाराष्ट्राला माहित आहे. जरा दमानं घ्या. असा टोलाही मिटकरी यांनी लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…एल्गार सभेनंतर मराठा समाज आक्रमक, भुजबळांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
हेही वाचा…ओबीसींच्या एल्गार सभेला गैरहजर का ? पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या…
हेही वाचा…सरकारमधीलच मंत्री अन् आमदारामध्ये शाब्दिक चकमक, पक्ष श्रेष्ठींकडे भाजप आमदार तक्रार मांडणार
हेही वाचा…पुण्यात बागेश्वर धाम यांचा सत्संग, फडणवीसही हजेरी लावणार, तर अजित पवार गटाचा विरोध
हेही वाचा…मुंबईत वाद पेटणार, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल, शिवसैनिक आक्रमक