मुंबई : मुंबईतील लोअर परेल पुलाचं उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. लोअर परळ पुलाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याचा आरोप मुंबई महापालिकेने आदित्य ठाकरे यांच्यावर केला असून एकूण चार कलमांच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुलाची स्थिरता चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांच्याकडून पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.
हेही वाचा…“भुजबळांचं वय झालंय, पण आपला दर्जा घसरू देणार नाही,” जरांगे पाटलांचं भुजबळांना प्रत्युत्तर
पालिकेने दाखल केलेल्या तक्रारीत कलम १४३ अंतर्गत बेकायदेशीर जमाव करणे, कलम १४९ समान उद्दिष्ट साधण्यासाठी जमाव जमवणे, कलम ३३६ लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे,कलम ४४७ गुन्हेगारी उद्देशाने अतिक्रमण करणे, इत्यादी कलमांतर्गत आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…“जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार”, आरक्षणासाठी वडेट्टीवारांनी घेतला प्रण
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्याकडून गुरूवारी लोअर परळमधील पुलाच्या दुसऱ्या लेनचं उद्घाटन करण्यात आलं. दिवाळीपुर्वी डिलाईन रोडवरील संपूर्ण पुल सुरू करण्याची ठाकरे गटाची मागणी होती. पुल खुला न झाल्यानं आदित्य ठाकरे यांच्याकडून गुरूवारी पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. मुंबई पालिकेच्या तक्रारीनंतर एन. एम. जोशी मार्ग पोलिसांत आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मंत्रिमंडळ बैठकीला २९ पैकी ‘या’ १६ मंत्र्यांची दांडी, राज्याचा कारभार कसा चालणार ?
हेही वाचा…“आज बाळासाहेब असते तर त्यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं असतं”, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या भावना
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांचं मुख्य कामांकडे दुर्लक्ष,” आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना पत्र, केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राडा, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…