मुंबई : मुंबई महापालिकेतील घोटाळ्यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात आता थेट राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असले तरी राज्याचे मुख्यमंत्री असलेले महोदय स्वत: च्या ताब्यात ठेवलेल्या आणि लोकांच्या सेवेसाठी असलेल्या नगरविकास विभागाच्या मुख्य कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा…“न्याय मिळाला नाही तर पिवळ्या झेंड्याला सलाम करून..,” विजय वडेट्टीवारांनी दिला कडक इशारा
सध्याच्या असंवैधानिक सरकारने केलेले घोटाळे, त्यात रस्ते घोटाळा, रस्त्यावरील फर्निचर घोटाळा, खडी घोटाळा, किंवा सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन घोटाळा यावर वारंवार तुमच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. या घोटाळ्यांची लोकायुक्तांकडे चौकशी करण्याची मागणी करून तुमचं लक्ष वेधल्यावर प्रशासनाला ध्यानाला आले असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा…“ओबीसींचा स्वत:चा पक्ष काढा, अन् आपली ताकद दाखवून द्या,” एल्गार मेळाव्यात भुजबळांकडे कोणी केली मागणी?
दरम्यान, मुंबई मेट्रो, वरळीतील डिलाईट रोड पुल, मुंबई ट्रान्स हॅबर लिंक प्रकल्प, बेस्ट बस यावरून देखील आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली आहे. त्याचाही उल्लेख आदित्य ठाकरे यांनी पत्रात केला आहे. याचसोबत मुंबई पालिकेतील कर्मचारी आणि बेस्टमधील कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचाही उल्लेख पत्रात केला आहे.
मी आज महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री. रमेश बैस जी ह्यांना पत्राद्वारे, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा अकार्यक्षम कारभार पुन्हा एकदा निदर्शनास आणून देत हस्तक्षेपाची मागणी केली. pic.twitter.com/myjedAAogn
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 17, 2023
READ ALSO :
हेही वाचा…बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राडा, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…“भुजबळांचं वय झालंय, पण आपला दर्जा घसरू देणार नाही,” जरांगे पाटलांचं भुजबळांना प्रत्युत्तर
हेही वाचा…“जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार”, आरक्षणासाठी वडेट्टीवारांनी घेतला प्रण
हेही वाचा…“तुझ्यासारखं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मोडत नाही”, भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल
हेही वाचा…“तुझ्यासारखं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मोडत नाही”, भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल