पुणे :मराठा आरक्षणावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भुमिका घेतल्याने पक्षात दुफळी निर्माण झाल्याचं चित्र आहे. भुजबळांच्या भूमिकेशी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी फारकत घेतली आहे. त्यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचं पक्षाचे उपाध्यक्ष उदय आहेर यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जे करतात ती दडपशाही”, भाजप नेत्याची टिका
छगन भुजबळांच्या विधानानंतर पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले मिळालेच पाहिजेत अशी मागणी केली आहे. याप्रकरणी पक्षाध्यक्ष अजित पवारांनी अधिकृतपणे भूमिका जाहीर करावी अशी विनंती उदय आहेर यांनी केली आहे. तसेच भुजबळ जे भूमिका मांडत आहेत. ती त्यांची व्यक्तिगत भूमिका असल्याचा सुरही या बैठकीत लावला गेला.
हेही वाचा…“संभाजी राजे तुम्ही फक्त एका समाजाचे नाहीत,”,छगन भुजबळांनी संभाजी राजेंना सुनावलं
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या ओबीसी सभेनंतर मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. पंढरपुरात मराठा समाजाकडून छगन भुजबळांचा पुतळा जाळण्यात आला आहे. यामुळे आता मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा नामदेव जाधवांवर हल्ला, हल्ल्याची जबाबदारी ‘या’ नेत्याने स्विकारली
हेही वाचा…नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांबद्दलची भुमिका आली अंगलट
हेही वाचा…नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांबद्दलची भुमिका आली अंगलट
हेही वाचा…“असे गुन्हे माझ्यावर होत असतील तर बाळासाहेबांना याचा अभिमान वाटत असेल”, आदित्य ठाकरे आक्रमक
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या, ठाकरे गटातील खासदारांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, केली ‘ही’ मागणी