नवी दिल्ली : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हांबाबत आजपासून निवडणुक आयोगात नियमीत सुनावणी होणार आहे. याआधी शेवटची सुनावणी ही ९ नोव्हेंबरला झाली होती, या सुनावणी दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाने बोगस कागदपत्र दिल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आज अजित पवार गटाकडून कशा पद्धतीने प्रत्युत्तर देण्यात येईल, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“असे गुन्हे माझ्यावर होत असतील तर बाळासाहेबांना याचा अभिमान वाटत असेल”, आदित्य ठाकरे आक्रमक
राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्यात अजित पवार गटाने थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकल्याने राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाबाबतची लढाई निवडणुक आयोगात पोहचली. यातच आजच्या सुनावणीत अजित पवार गट कशा पद्धतीने युक्तिवाद करणार ? त्याकडे सर्वांचं लक्ष आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या, ठाकरे गटातील खासदारांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, केली ‘ही’ मागणी
दरम्यान, अजित पवार आज दिल्लीत येण्याची शक्यता आहे. निवडणुक आयोगात राष्ट्रवादी नेमकी कुणाची याबाबत आज सुनावणी होत आहे. आजच्या सुनावणीला अजित पवार उपस्थित राहणार का ? याकडे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे शरद पवार देखील दिल्लीत थोड्याच वेळात दाखल होणार आहेत. यातच आजच्या सुनावणीला शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासणं कितपत योग्य”? शरद पवारांवर कायदेशीर कारवाई करणार, जाधवांचा इशारा
हेही वाचा…पुण्यात मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, भुजबळांच्या वक्तव्यावरही चर्चा
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा नामदेव जाधवांवर हल्ला, हल्ल्याची जबाबदारी ‘या’ नेत्याने स्विकारली
हेही वाचा…नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांबद्दलची भुमिका आली अंगलट
हेही वाचा…नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांबद्दलची भुमिका आली अंगलट