पुणे : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदत दिल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी सभांचा धडाका सुरू केला आहे. दोन दिवसापुर्वी मनोज जरांगे पाटलांनी दक्षिण महाराष्ट्रात सभा घेऊन राज्य सरकारला मराठा आरक्षण घेणारच अशी एकप्रकारे चेतावणीच दिली आहे. तर यातच आज शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटलांची तोफ धडाडणार आहे.
हेही वाचा…नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांबद्दलची भुमिका आली अंगलट
पुण्यातील खराडी येथे आज मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत आहे. खराडी येथील महालक्ष्मी लॉन्सवर सभा होत असून या सभेसाठी सकल मराठा समाजाकडून मोठी तयारी करण्यात येत आहे. जरांगे पाटील यांच्या सभेसाठी गर्दी जमायला सुरूवात झाली असून सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त दैखील तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा…नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांबद्दलची भुमिका आली अंगलट
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटील यांची सभा होत असल्याने या सभेत जरांगे पाटील काय बोलणार? त्याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलंय. यातच सभेसाठी पुण्यातील लाल महाल येथून थोड्याच वेळात बाईक रॅली देखील निघणार असून मराठा समाजाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. यातच पुण्यात जरांगे पाटलांच्या सभेमूळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्विकारला असता तर…” वडेट्टीवारांचं मोठं विधान, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
हेही वाचा…राष्ट्रवादी नेमकी कुणाची ? निवडणुक आयोगात होणार फैसला, सुनावणीसाठी शरद पवार अन् अजित पवार राहणार उपस्थित
हेही वाचा…“नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासणं कितपत योग्य”? शरद पवारांवर कायदेशीर कारवाई करणार, जाधवांचा इशारा
हेही वाचा…पुण्यात मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, भुजबळांच्या वक्तव्यावरही चर्चा
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा नामदेव जाधवांवर हल्ला, हल्ल्याची जबाबदारी ‘या’ नेत्याने स्विकारली