मुंबई : महाराष्ट्र पेटलेला असताना भाजपचे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो ट्विट करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर आता भाजपकडून आदित्य ठाकरे यांचा फोटो ट्विट करून प्रत्युत्तर दिलंय. त्यातच आता पुन्हा संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधत कडक इशारा दिलाय.
हेही वाचा…“दानपेट्या काढल्या तर मंदिरात एकही पुजारी दिसणार नाही”, कुणी केलं ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य
संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा जुगार खेळत असतांनाचा फोटो ट्विट केला आहे. त्यात १९ नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ, Veneshine. साधारण ३.५० कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्वावादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? असा खोचक गंभीर राऊतांनी केलाय.
हेही वाचा…आगामी निवडणुकांसाठी भाजपने कसली कंबर, निवडणुक प्रमुखांना फडणवीस देणार मोलाचा संदेश
राऊतांच्या टिकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. भाजपने आदित्य ठाकरे यांचा फोटो ट्विट करत असं म्हटलंय की, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ स आदित्य ठाकरेच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की?
हेही वाचा…शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार, मराठा समाजाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
दरम्यान, ते म्हणे.. फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत..जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय! अस म्हणत संजय राऊतांनी भाजपला इशारा दिलाय.
ते म्हणे..
फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत..जाऊ द्या.
त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का?
ते म्हणे..
कधीच जुगार खेळले नाहीत..
मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का?
जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल!
झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!@BJP4Maharashtra… pic.twitter.com/aIjd3eJTO0— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत.
ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर.
असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ @rautsanjay61 , आदित्य… pic.twitter.com/TGCTOeNpYx— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपच्या बड्या नेत्याने जुगारात ३.५० कोटी उडवले,”? राऊतांनी ट्विट करत ‘या’ नेत्यावर साधला निशाणा
हेही वाचा…“भुजबळांच्या ‘त्या’ भूमिकेला समर्थन नाही,” वडेट्टीवारांचं वक्तव्य, ओबीसी नेत्यांमध्ये दुफळी ?
हेही वाचा…अकोला हादरलं..! मुंडन करून सिगारेटचे चटके देत १४ वर्षीय मुलीवर अत्याचार, कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…ठाकरे गटाच्या ५० ते ६० पदाधिकाऱ्यांना पाठवल्या नोटीसा, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय ?
हेही वाचा…खासदाराच्या मातोश्रीचं निधन, मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील रूग्णालय गाठून घेतलं अत्यंदर्शन