मुंबई : मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन काळे यांच्याकडून मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ होत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार काळे यांच्याविरोधात अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
“मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू”; शिवसेना नेत्याला धमकी
दरम्यान, या प्रकरणाला आता अजून वेगळे वळण मिळाले असून, संजीवनी काळे यांनी या प्रकरणात पोलिसांकडून माझ्यावर सेटलमेंटसाठी मानसिक दबाव आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे, आता हे प्रकरण आणखीन चिघळणार असल्याचे दिसून येत असून, आता पोलिसांच्याही भूमिकेवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नितीन राऊतांच्या मनात नाना पटोलेंबद्दल अढी? नागपूर काँग्रेसमध्ये मतभेदाच्या चर्चेला उधाण
हे काय चाललयं राज्यात @CMOMaharashtra @maharashtra_hmo आपण पोलिसांना गुन्हा नोंद झाल्यावर आरोपीवर कारवाई न करता सेटलमेंट करा असे आदेश दिलेत का ??@DGPMaharashtra गुन्हा नोंद होऊनही @Navimumpolice कार्यवाही का करत नाहीत कुठल्या अधिकारात सेटलमेंट करण्यास सांगताहेत ??
उत्तर द्या pic.twitter.com/7LjN9i0inZ— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 14, 2021
संजीवनी यांनी ट्विट करून, “नमस्कार चित्राताई, मी संजीवनी गजानन काळे, मी 11 तारखेला माझे पती गजानन काळेंवर एफआयआर दाखल केली होती, ३ दिवसांनंतरही त्यांना अरेस्ट झालेली नाही, मला न्याय मिळालेला नाही, मी पोलिसांकडे गेले होते काल, तर पोलिसांनी माझ्यावर प्रचंड मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला, सेटलमेंट करण्याचा विषय झाला” असं धक्कादायक आरोप केला आहे. तसेच, “मला न्याय द्या,” अशी मागणी त्यांनी चित्रा वाघ यांच्याकडे केली आहे.
राजकीय कटकारस्थान रचून मला अडकविण्याचा प्रयत्न; बीएचआर प्रकरणावरून आमदार मंगेश चव्हाण संतापले
त्यावर आता चित्रा वाघ यांनीही प्रतिक्रिया दिली असून, “हे काय चाललयं राज्यात, आपण पोलिसांना गुन्हा नोंद झाल्यावर आरोपीवर कारवाई न करता सेटलमेंट करा असे आदेश दिलेत का ? गुन्हा नोंद होऊनही नवी मुंबई पोलीस कार्यवाही का करत नाहीत? कुठल्या अधिकारात सेटलमेंट करण्यास सांगत आहेत? उत्तर द्या” अशी मागणी ट्विटवरून व्हिडीओ शेअर करत केली आहे. त्यामुळे, संजय राठोड यांच्या पाठोपाठ इथेही पोलिसांच्या भूमिकेवर सवाल निर्माण झाल्याने, पोलीस काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्व लक्ष आहे.
Read Also :
- गडकरींच्या स्फोटक पत्राची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत, पोलीस महासंचालक दिले महत्त्वाचे आदेश
- “शिवसैनिकांना आवरा नाहीतर…”, गडकरींचे मुख्यमंत्र्यांना स्फोटक पत्र
- विरोधकांनी भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी किरीट सोमय्याला चुकीची महिती दिली – आमदार सुनिल शेळके
- राज्यपालांवर भाजपचा दबाव, त्यांनी स्वतःला राजकीय प्यादं म्हणून वापरून घेऊ नये!” राऊतांची खरमरीत टीका
- गावचा विकास करायचाय, कोरोनाचे नियम पाळून ग्रामसभा घेऊ द्या, शिवसेना खासदाराचं राज्य सरकारला साकडं