नागपूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्षाने आधीच स्वबळाची घोषणा दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पक्षाची जोरदार तयारी सुरु असून, मोर्चेबांधणीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हिरीरीने काम करत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, नागपूर महापालिकेत मागील १५ वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता आहे. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसनं जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे.
“मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू”; शिवसेना नेत्याला धमकी
या पार्श्वभूमीवर, पटोले यांनी शहारात आढावा बैठका आणि कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. आज त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसकडून ‘व्यर्थ न हो बलिदान’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मंत्री सुनील केदार आणि काँग्रेसचे इतर कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री नितीन राऊत यांनी कार्यक्रमाला अनुपस्थिती लावल्याने, नागपूर काँग्रेसमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे.
गडकरींच्या स्फोटक पत्राची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत, पोलीस महासंचालक दिले महत्त्वाचे आदेश
यापूर्वी पटोलेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या मार्गदर्शन शिबीराला, तसेच इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आयोजित केलेल्या सायकल रॅलीतही राऊत यांनी हजेरी लावली नव्हती. विशेष म्हणजे, नागपूर महापालिकेच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील त्यांनी दांडी मारल्याने, नितीन राऊतांच्या मनात नाना पटोलेंबद्दल अढी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
“शिवसैनिकांना आवरा नाहीतर…”, गडकरींचे मुख्यमंत्र्यांना स्फोटक पत्र
दरम्यान, यंदा नागपूर महापालिकेवरचा भाजपचा झेंडा खाली उतरवायचा, असा निश्चय काँग्रेसने केला आहे. त्या दृष्टीने काँग्रेस नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. “पक्षाने आदेश दिल्यास नागपूर दक्षिण-पश्चिममधून लढेन,” असं वक्तव्य पटोले यांनी केलं होतं. हा मतदारसंघ विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नाना पटोले देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Read Also :
- राज्यपालांवर भाजपचा दबाव, त्यांनी स्वतःला राजकीय प्यादं म्हणून वापरून घेऊ नये!” राऊतांची खरमरीत टीका
- गावचा विकास करायचाय, कोरोनाचे नियम पाळून ग्रामसभा घेऊ द्या, शिवसेना खासदाराचं राज्य सरकारला साकडं
- “काम करणारे पुढे या, फोटोसाठी पुढे पुढे मिरवणाऱ्यांनी बाजूला व्हा ”, अजित पवारांच्या कानपिचक्या
- महाविकास आघाडीला शह देण्यासाठी ‘बिग ४’ तयार, १६ ऑगस्टपासून भाजपचं मिशन ‘जन आशीर्वाद’
- राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या वादाची याचिका, हायकोर्टाने निकालात काढली; दिला अनपेक्षित निर्णय