पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता संबंधितांना जागेवर खडसावणं ही अजित पवारांची पद्धत अनेकदा पहायला मिळाली आहे. आजही बारामतीत अजित पवारांनी काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनी बाजूला व्हा असं म्हणत फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या..
उच्च न्यायालयाप्रमाणे राज्यपाल देखील संविधानाच्या लक्ष्मण रेषेचं पालन करतील – रोहित पवार
कोरोना आणि नुकत्याच झालेल्या पूरग्रस्त मदत आणि साहित्याचं वाटप अजित पवार यांच्या हस्ते होत असतं. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आठवड्यातून एक दिवस बारामतीत येत असतात. या दरम्यान, विकासकामांची पाहणी, कोरोना आढावा बैठक असा त्यांचा दिनक्रम असतो. त्याचबरोबर आजही विद्या प्रतिष्ठान संकुलाच्या परिसरात विविध संस्थांच्या वतीने आयोजित समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी अजित पवार यांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
बदल्यांसंदर्भात मंत्रालयात थेट सिल्वर ओक वरून कॉल? हॅलो, मी शरद पवार बोलतोय!
बारामतीतील अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी मिरवणारे बाजूला व्हा, ज्यांनी काम केलंय, त्यांना पुढे येऊ द्या अशा शब्दात कानपिचक्या दिल्या. तर बाजूलाच स्व. तुकाराम भापकर प्रतिष्ठानकडून 5 टँकर देण्यात आले. त्यावेळीही अजित पवारांनी ज्यांनी काम केलंय त्यांनी फोटोसाठी उभे रहा आणि बाकीचे बाजूला व्हा असं आपल्या खास शैलीत सांगत समाजोपयोगी काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं.
स्पष्टवक्ते आणि रोखठोक स्वभाव असलेले अजित पवार नेहमीच आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. आजही त्यांनी फोटोसाठी पुढे पुढे येणाऱ्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये कानपिचक्या दिल्या. त्यामुळं फोटोसाठी नाहक पुढे पुढे करणाऱ्यांना चांगलाच चाप बसलाय हे मात्र नक्की.
Read Also :
- बंदी असताना गोपीचंद पडळकरांकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन; ठाकरे सरकार कारवाई करणार ?
- उच्च न्यायालयाप्रमाणे राज्यपाल देखील संविधानाच्या लक्ष्मण रेषेचं पालन करतील – रोहित पवार
- महाविकास आघाडीला शह देण्यासाठी ‘बिग ४’ तयार, १६ ऑगस्टपासून भाजपचं मिशन ‘जन आशीर्वाद’
- पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक
- सरकारला सत्तेचा माझं आहे, पुणे पोलिसांची भूमिकाही दुपट्टी; चित्रा वाघ कडाडल्या