पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी येत्या २० ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या बैलगडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. पडळकरांनी बंदी असताना ठाकरे सरकारविरोधात बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे. त्यामुळे, ठाकरे सरकार भाजप आमदारावर कारवाई करणार का? की पडळकरांच्या एल्गारापुढे नमते घेवून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
औरंगजेब आणि चंद्रकांत खैरे या दोघांनी औरंगाबाद शहर खिळखिळ केलं; भाजप आमदाराचा घणाघात
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बैलडागा शर्यतीसाठी पडळकरसुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे या गावात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीत प्रथम येणाऱ्यास त्यांनी १ लाख ११ हजार रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलं आहे. द्वितीय तसेच तृतीय आणि चौथा क्रमांक पटकावणाऱ्यांनाही वेगवेगळे बक्षीस देण्यात येणार आहे.
राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या वादाची याचिका, हायकोर्टाने निकालात काढली; दिला अनपेक्षित निर्णय
बैलगाडा शर्यती सुरु करण्याची मागणी घेऊन राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेसुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी १२ ऑगस्ट रोजी पशुसंवर्धन राज्यमंत्री सुनील केदार यांना भेटून यासंदर्भातील निवेदन दिलं होतं. राज्य सरकारने पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टाचे वकील आणि संघटनांची बैठक लावून मार्ग काढला पाहिजे, अशी मागणी त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली होती. बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा, आपुलकीचा विषय आहे. बैलगाडा शर्यतीसंदर्भात राज्य शासनाने केलेल्या कायद्या विरोधातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची सुनावणी तत्काळ घेण्यात यावी, अशी मागणी लंके यांनी केली होती.
युती सरकारच्या काळात झालेल्या कथित चिक्की वाटप घोटाळा प्रकरणात आला नवा ट्विस्ट
दरम्यान, बैलगाडा शर्यतीच्या पार्श्वभूमीवर येत्या २० ऑगस्ट रोजी पडळकर यांनी शर्यतीसाठी छकडा घेऊन सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात बैलगाडा शर्यत बंदीचा कायदा लागू असूनदेखील पडळकर यांनी शर्यतीचे आयोजन केले आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी बैलगाडा शर्यत भरलीच तर ठाकरे सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- उच्च न्यायालयाप्रमाणे राज्यपाल देखील संविधानाच्या लक्ष्मण रेषेचं पालन करतील – रोहित पवार
- महाविकास आघाडीला शह देण्यासाठी ‘बिग ४’ तयार, १६ ऑगस्टपासून भाजपचं मिशन ‘जन आशीर्वाद’
- पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक
- सरकारला सत्तेचा माझं आहे, पुणे पोलिसांची भूमिकाही दुपट्टी; चित्रा वाघ कडाडल्या
- परमबीर सिंह यांना दोन प्रकरणात लूक आऊट नोटीस, कोणत्याही क्षणी बेड्या पडण्याची शक्यता