मुंबई : राजकारणाच्या वर्तुळातुन एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करुन, “सिल्व्हर ओकमधून बोलतोय,” असा बोगस फोन थेट मुख्यमंत्री कार्यलयात, एका इसमाकडून करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की, ही लोकशाहीला अशोभनीय घटना; राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
दरम्यान, शरद पवारांचा आवाज काढून या इसमाने, अमुक एक व्यक्तीची बदली अमुक ठिकाणी करा, असं सांगितलं, याने मंत्रालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गावदेवी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि मग केलेल्या चौकशीत, हा कॉल बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यांनतर खंडणी विरोधी पथकाकडून तपास सुरू झाला आणि एकाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
“…एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल,” पडळकरांचा वडेट्टीवारांवर जोरदार निशाणा
दुसरीकडे, असाच एक प्रकार चाकणमधल्या एका व्यक्तीबाबतही झाला असून, फोनवर शरद पवार बोलत असल्याचे सांगून “जमीन प्रकरण मिटवा” असं सांगण्यात आलं. या प्रकरणी प्रताप खांडेभारड यांनी चाकण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. धीरज धनाजी पठारे असं मुख्य आरोपीचे नाव असून, त्याचा साथीदार गुरव याने पवारांच्या आवाजाची नक्कल करून खांडेभराड यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. त्यामुळे, यातून ही शरद पवारांची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Read Also :
- मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा; पत्नीनं केली तक्रार
- माझा पराभव त्यांच्यामुळेच…चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक गौप्यस्फोट; केले भाजप केंद्रीय मंत्र्यावर गंभीर आरोप
- बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या ५ बड्या नेत्यांवर ट्विटरची कारवाई, आम्ही लढत राहू! काँग्रेसचा निर्धार
- भाजप नेत्याच्या अकलेचे तारे; मोदींची तुलना केली थेट छत्रपती शिवाजीमहाराज आणि राजा शालिवाहन यांच्याशी
- कोरोनाकाळात ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा, पंतप्रधांनच सगळ्या मृत्यूंना जबाबदार