मुंबई : गणराया, राज्यावरील कोरोनाचं संकट दूर कर आणि काही लोकांच्या मनातील द्वेषाचा रोगही दूर कर, असे साकडे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बाप्पाला घातले. भुजबळ यांनी आज अंजिरवाडी येथील बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अंजिरवाडीतील बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला.
ठाकरे कुटुंबाची मर्जी राखण्यासाठी धडपड, महिलांवरील अत्याचाराबाबत नीलम गोऱ्हे यांचे मौन का?
छगन भुजबळ यांनी अंजिरवाडीतील बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पहिल्यांदा कोरोना दूर करा. कोरोना दूर झाल्यानंतर काही लोकांच्या मनातील रोग दूर करा. सर्वांना निरोगी करा, शारीरिक आणि मानसिकृष्ट्याही. कोरोनाचा दूर करावा तसे मनामनातले रोगही दूर करावेत असं साकडं मी गणरायांना घातलं आहे, असं भुजबळ म्हणाले.
राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांकडून महिला सरपंचाला मारहाण; गौरी गायकवाड देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार
महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गणपतीही आशीर्वाद देतात आणि नियती आशीर्वाद देते ती जनतेच्या माध्यमातूनच देते. नियतीने आशीर्वाद दिला. त्यामुळे मला न्याय मिळत चालला आहे. आणखीही न्याय मिळेल. दोन प्रकरणात न्याय मिळाला. महाराष्ट्र सदन हे बेसिक आहे. बाकीच्या केसेस या त्याच पायावर उभ्या आहेत. इकडून तिकडून या केसेस तयार केल्या आहेत. आता न्यायदेवतेलाही माहीत झाले आहे. काय आहे आणि काय नाही. त्यामुळे आम्हाला आनंद आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळत आहे, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या बैठकीवर आणि मुख्यमंत्री-पवार यांच्या भेटीवर अजित पवार म्हणतात…
यावेळी त्यांनी ईडीच्या होत असलेल्या गैरवापरावरही त्यांनी टीका केली. मागे सर्वोच्च न्यायालय म्हणाले होते की, सीबीआय हा पपेट आहे. आता ईडी हा केंद्र सरकारचा दुसरा पपेट आहे. ईडीचा एवढा दुरुपयोग कधीही झाला नव्हता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही तेच सांगितलं. शिवसेनेच्या स्थापनापासून मी राजकारणात आहे. कधी यांचं तर कधी त्यांचं सरकार आलं. वाजपेयींचंही सरकार आलं. पण अशी वागणूक कधीच दिली गेली नाही. जिथे जिथे विरोधी पक्षांचं सरकार आहे, विरोधक प्रबळ आहेत. तिथे या सर्वांना त्रास सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.
Read Also :
- उत्तर प्रदेशातील जमीनदारासारखी आजच्या काँग्रेसची अवस्था – शरद पवार
- मोठी बातमी : भाजपच्या माजी मंत्र्याची गळा दाबून हत्या; राहत्या घरातच सापडला मृतदेह
- शिवसेनेला अजून एक धक्का : माजी खासदार आनंदराव अडसूळ, मुलगा, जावयाकडे ईडीच्या धाडी
- साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजे समर्थकांत तुफान राडा, ६ गंभीर जखमी १६ जणांविरोधात गुन्हा
- परमबीर सिंग आणि भाजपचं साटंलोटं? नवाब मलिकांनी केला गंभीर आरोप