मुंबई : अंबानींच्या ‘अँटिलीया’ इमारतीबाहेर जिलेटीनच्या स्फोटकांनी भरलेली गाडी वाझेने प्रसिद्धिसाठीच ठेवली असल्याचा आरोप शुक्रवारी NIA ने न्यायालयात दाखल केलेल्या १० हजार पानांच्या आरोपपत्रात केला असून, उत्तम तपास अधिकारी म्हणून पुन्हा नावलौकिक प्राप्त होईल, अशी आशा वाझेला होती, असा खुलासा NIA केला आहे. तसेच, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्याकडे मनसुख हिरेन यांना मारण्याचं काम देण्यात आलं होतं, असा देखील खुलासा NIA ने केला असल्याचं समोर आलं आहे.
‘या’ अधिकाऱ्यावर होती हिरेनच्या हत्येची जबाबदरी, NIA च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
दरम्यान, NIA च्या या आरोपानंतर, “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी भाजपसोबत ‘डील’ केली आहे. परिणामी NIA ने त्यांना आरोपी केलं नाही”, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, “तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि तत्कालीन गृहमंत्र्यांची दिशाभूल केली आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचं काम केलं,” असाही थेट आरोप त्यांनी केला आहे.
परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या, भ्रष्टाचारप्रकरणी जामीनपात्र वॉरंट जारी
मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या माध्यमातून देशमुखांच्याविरोधात कट रचल्याचा आरोप याआधी मालिक यांनी केला होता. यावेळी त्यांनी, ‘NIA च्या चार्जशीटमध्ये सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ५ लाख रुपये दिले होते, असं सायबर एक्स्पर्टने सांगितलं आहे,’ असा दावा देखील केला आहे.
…म्हणून वाझेने ‘अँटिलीया’बाहेर पार्क केली स्फोटकांची गाडी, NIA ने केले आरोपपत्र दाखल
“NIA चार्जशीटमध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं की माजी मुंबई पोलीस आयुक्तांनी तपासाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. NIA च्या हे लक्षात आल्यानंतर सिंग यांनी भाजपशी सौदा करत, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्यावर आरोप केला. त्यामुळेच NIA ने त्यांना या आरोपत्रात आरोपी केलेलं नाही.” दरम्यान, त्यांच्या या गंभीर आरोपावर अद्याप भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
Read Also :
- अजित पवार जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रं उघड करण्याची हिंमत का दाखवत नाहीत? – किरीट सोमय्या
- राष्ट्रवादीच्या बैठकीवर आणि मुख्यमंत्री-पवार यांच्या भेटीवर अजित पवार म्हणतात…
- ठाकरे कुटुंबाची मर्जी राखण्यासाठी धडपड, महिलांवरील अत्याचाराबाबत नीलम गोऱ्हे यांचे मौन का?
- कोर्टाच्या दिलासादायक निर्णयांनंतर भुजबळांनी, शायराना अंदाजात दिली पहिली प्रतिक्रिया
- मिशन २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर; विधानसभा मतदार संघनिहाय अध्यक्ष, पदाधिकार्यांची नावे…