मुंबई : निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाच्या सुनावणीला, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारीही अनुपस्थित दर्शवली आहे. सिंग हे सलग चौथ्यांदा सुनावणीला हजर राहिले नसल्याने आता आयोगानं त्यांच्यावर मोठी कारवाई केली असून, त्यांच्याविरूध्द मंगळवारी जामीनपात्र अटक वॉरंट बजावलं गेलं आहे. त्यामुळं आता सिंग यांच्या अडचणी मोठी वाढ झाली आहे. १०० कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात चांदीवाल न्यायिक आयोगाने त्यांच्याविरुद्ध हे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
समन्सनंतर आता ईडीकडून देशमुखांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी
सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. त्यांनतर या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, आयोगानं या प्रकरणाची सुनावणी सुरू केल्यापासून एकदाही सिंग त्या सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यासाठी पाच वेळा आयोगाकडून त्यांना दंडही ठोठावण्यात आला.
The commission also directed Maharashtra DGP to appoint a high rank officer to issue the warrant. It also asked to furnish Rs 50000 bond at the time of execution of warrant.
— ANI (@ANI) September 7, 2021
त्यांनतर आता त्यांच्याविरुद्ध आयोगाने थेट अटक वॉरंट जारी केले आहेत. या आयोगाला सिंग यांची या प्रकरणी चौकशी करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. याच कालावधीत आरोपांच्या अनुषंगाने आयोगाकडून चौकशी केली जाणार आहे. मात्र सिंग यांनी हा आयोगच बेकायदेशीर असल्याचे सांगत कामकाज थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत मागणी केली आहे. अद्याप त्यावर न्यायालयात अंतिम सुनावणी झालेली नाही.
अनिल देशमुख प्रकरणात नवी माहिती समोर, आयफोनसाठी केला चौकशी अहवाल लीक
दुसरीकडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवतीही सीबीआय आणि ईडी चौकशीद्वारे आपला फास आवळत असून, काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने समन्स रद्द करण्याच्या देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिल्यांनतर, आता उच्च न्यायालयानेही यावर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. तसेच, देशमुखांच्या वकिलाला सीबीआयने ताब्यात घेतले असून, त्यांना ७ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. यातच आता त्यांच्या विरोधातईडीने लुकआउट नोटीस जारी केली आहे.
Read Also :
- हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का? – प्रसाद लाड
- राज्यात कॉलेजेस कधी सुरू होणार? अखेर मुहूर्त ठरला! उदय सामंत यांची मोठी घोषणा
- “OBC आरक्षणाशिवाय निवडणूका होय नयेत! पण…”, शरद पवारांनी केलं मोठं विधान
- मोहन भागवतांच्या ‘सर्व धर्म एकचं आहेत’ विधानावर शरद पवारांनी लगावला टोला
- “भानगडी करणारेच सत्तेत होते, मग ईडी का कारवाई करेल?” भाजपाचं पवारांना प्रत्युत्तर