मुंबई : देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील डागा यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं. दोघांनाही सीबीआयकडून कोणत्याही प्रकारचं समन्स सुनावण्यात आलं नव्हतं. आपल्या गाडीने जात असताना सीबीआयने गाडी रोखून ही कारवाई केली. २० मिनिटांच्या चौकशीनंतर जावयाची सुटका करण्यात आली आहे. मात्र, वकील डागा आणि नंतर सीबीआय अधिकारी अभिषेक तिवारीला देशमुख यांना क्लीनचिट दिल्याचा प्राथमिक चौकशी अहवाल लीक झाल्याच्या संदर्भात अटक करून ७ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
फास आणखी आवळला, देशमुखांचे वकिल आणि तिवारी यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी
या पार्श्वभूमीवर आता नवीन माहिती समोर आली असून, अभिषेक तिवारीने आयफोनसाठी 12 प्रो साठी हा चौकशी अहवाल लीक केला असल्याचे सांगण्यात आले आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, २८ जूनला तिवारी, देशमुख प्रकरणाच्या तपासासाठी पुण्याला गेला होता. यावेळी त्यांची, देशमुखांचे वकील आनंद डागा यांच्याशी भेट झाली. तेव्हा, डागा यांनी चौकशी अहवाल लीक करण्यासाठी तिवारींना आयफोन 12 प्रो ची लाच दिली होती.
१२ आमदाराच्या यादीतून माझं नावं वगळल्यास, राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टी आक्रमक
तसेच, या प्रकरणी आता सीबीआयने हा फोन जप्त केला असून, फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवला आहे. यात असे समोर आले आहे की, तिवारी नियमितपणे देशमुखांच्या वकीलाकडून लाच घेत होता. तक्रारीत असेही म्हटले आहे, की तपास अधिकारी आर. एस. गुंजियाल यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक आणि संशयित अभिषेक तिवारी हे माजी मंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्यासाठी ६ एप्रिल रोजी मुंबईत आले होते.
तिला मरू दे ना…,तु कशाला बदनाम होतोयं…; मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून बलात्काराच्या आरोपीला अभय ?
दरम्यान, डागा यांच्या अटकेनंतर बुधवारी मध्यरात्री त्यांना मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आले आणि गुरुवारी दुपारी दोघांना दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांनी अज्ञात लोकांसह गुन्हेगारी स्वरूपाचा कट केल्याचा, सीबीआयचा तपास भरकटवण्यासाठी संवेदनशील आणि गोपनीय कागदपत्रे वकिलाला पुरवल्याचा, स्वत:साठी गैरवाजवी फायदा आणि लाच मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
Read Also :
- “भाजपत देखील महिलांना डावललं जातं!”, आमदार मंदा म्हात्रेंचं मोठं विधान
- चुकीचे वागणाऱ्यांची शहनिशा करणे आमचे कामच; नगरसेवकांवर दाखवलेल्या अविश्वासाला अजितदादांचा पाठींबा
- ईडीच्या माध्यमातून भाजप आम्हाला बदनाम करतयं, खडसेंच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी – जयंत पाटील
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
- ओबीसी आरक्षणाबाबत इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमत