मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून त्यांची सीबीआय आणि ईडी या दोन केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. तसेच, त्यांच्यावर सीबीआय पाठोपाठ आता ईडीकडूनही चौकशीची टांगती तलवार आहे. यातच आता काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने देशमुखांना दणका दिल्यांनतर उच्च न्यायालयानेही समन्स रद्द करण्याच्या देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
देशमुखांच्या जावयावर केलेल्या कारवाईनंतर, सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप
दुसरीकडे, काल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील डागा यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं. दोघांनाही सीबीआयकडून कोणत्याही प्रकारचं समन्स सुनावण्यात आलं नव्हतं. आपल्या गाडीने जात असताना सीबीआयने गाडी रोखून ही कारवाई केली. २० मिनिटांच्या चौकशीनंतर जावयाची सुटका करण्यात आली आहे. मात्र, वकील डागा यांना देशमुख यांना क्लीनचिट दिल्याचा प्राथमिक चौकशी अहवाल लीक झाला होता. त्यासंदर्भात अटक केली आहे.
A Delhi court remands former Maharashtra Home Minister Anil Deshmukh's lawyer Anand Daga and Sub-Inspector Abhishek Tiwari to two-day CBI custody
— ANI (@ANI) September 2, 2021
या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड घडत असून, मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी तपास यंत्रणांचा फास देशमुखांच्या भोवती आणखीन आवळत चालला आहे. कारण, सीबीआयने बुधवारी देशमुखांचे जावई व वकील डागा यांना ताब्यात घेतल्यानंतर, डागा आणि सीबीआय कार्यालयातील उपनिरिक्षक अभिषेक तिवारी यांना सीबीआयचे पथकाने दिल्लीला नेले होते. त्यांना दिल्लीतील सीबीआय न्यायालयात हजर केल्यानंतर, आता न्यायालयाने दोघांनाही ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
“त्यावेळी कुठे गेला कायदा? नवाब मलिकजी…”, CBI च्या कारवाईवरून भाजप-राष्ट्रवादीत वाक्युद्ध
देशमुखांना, सीबीआयकडून क्लीनचीट दिल्याचा कथित अहवाल मागच्या आठवड्यात समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर सीबीआयच्या प्राथमिक तपासात देशमुखांच्या लिगल टीमने तिवारी यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आल्याने दोघांनाही दिल्लीला नेण्यात आले आणि त्यानंतर वकील डागा आणि सीबीआयचे उपनिरिक्षक यांच्यावर ही कारवाई केली गेली आहे. दुसरीकडे, देशमुखांना आत्तापर्यंत ईडीकडून पाच वेळा समन्स बजावण्यात आले असून, त्यांनी दाद दिली नाहीये.
Read Also :
- विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – विनायक मेटे
- काही नावांवर राज्यपालांचा आक्षेप, आता अजित पवारांनी केले राजू शेट्टींच्या आमदारकीवर भाष्य
- १२ आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याच्या चर्चेवर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया
- महाराष्ट्रात पुन्हा Lockdown? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
- “शिवसेनेला मराठवाडा-विदर्भात भाजपने वाढवलं”, चंद्रकांत पाटलांचं विधान