भिवंडी : “भाजपत सर्वांना समान संधी दिली जाते”, “भाजपत महिलांना सन्मान दिला जातो”, अशी विधाने भाजप नेत्यांकडून केली जातात. मात्र, याला छेद देणारं विधान भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केलं असून, हे विधान महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत केल्याने, आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. “राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांचा योग्य सन्मान होत नाही”, असा गंभीर आरोप त्यांनी जाहीरपणे केला आहे.
चुकीचे वागणाऱ्यांची शहनिशा करणे आमचे कामच; नगरसेवकांवर दाखवलेल्या अविश्वासाला अजितदादांचा पाठींबा
त्या, दैनिक लोकमतने आयोजित केलेल्या ‘लोकमत वुमन अचिव्हर्स अवॉर्ड’च्या कार्यक्रमात, भिवंडीच्या समाजसेविका व ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शारदा सुरेश म्हात्रे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन, लोकमतकडून शुक्रवारी त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी ही खंत बोलून दाखवली. या कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर, अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर, अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेत्री श्रेया बुगडे उपस्थित होत्या.
ईडीच्या माध्यमातून भाजप आम्हाला बदनाम करतयं, खडसेंच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी – जयंत पाटील
“मी दोनवेळा विधानसभेवर निवडून आले. मात्र त्यानंतरही पक्षाकडून डावललं जातं होतं.त्यामुळे मागच्या विधानसभा निवडणुकीत मी पक्षाला अपक्ष लढण्याचे संकेत दिले होते. ती निवडणुक स्वतःच्या जीवावर मी निवडून आले. पहिल्या वेळी आले तेव्हा ‘मोदी लाट’ होती म्हटलं गेलं. पण दुसऱ्या वेळेला मोदींची लाट नव्हती ना? ते माझं काम होतं, पण महिलांच्या कामाला झाकून टाकायचं, त्यांच्या कामाला प्रसिद्धी द्यायची नाही, असे प्रकार होतात”, असं त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
तसेच यावेळी त्यांनी व्यासपीठावरून भाजपवर हल्लाबोल करत, पक्षाला घरचा आहेर दिला. “मी कोणालाही घाबरत नाही. घाबरण्याची मला गरज नाही. मी नेहमीच स्पष्टच बोलते. मग तिकीट द्या, किंवा देऊ नका! मी लढणार म्हणजे लढणार. आपल्याला इतर पक्ष असतात साथ द्यायला,” असं म्हणत, “राजकारणात महिलांना यश मिळतंय म्हटल्यानंतर स्वपक्षातीलच नेते महिला नेत्यांचे पंख छाटून टाकतात. पण आपण स्वतःला कमी समजू नये”, या शब्दांत त्यांनी मनातली खदखद व्यक्त केली.
Read Also :
- ओबीसी आरक्षणाबाबत इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमत
- “सेनेसोबत युतीचा विचारही नाही! पण भविष्यात काहीही होऊ शकते; पाटलांचे सूचक विधान
- मोठी बातमी! आमदार संग्राम जगतापांवर गंभीर आरोप, काँग्रेस नेत्यावरही विनयभंगाचा गुन्हा
- “प्रत्येक मंदिरात एक ‘ठाकरे-पवार दानपेटी’ बसवली तर…”; भाजपाचा सवाल
- महापालिका रणधुमाळी २०२२: राज्यातील सर्व महापालिका लढवणार, आम आदमी पार्टीची घोषणा