पुणे : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या ‘शंखनादा’नंतर गुरुवारपासून मनसेचे घंटानाद आंदोलन सुरु झालं आहे. भाजपने सोमवारी राज्यभरात ठिकठिकाणी मंदिरांबाहेर शंखनाद आंदोलन केले. भाजपच्या सुरात सुर मिसळत राज ठाकरे यांनीही मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. मंदिरांच्या मुद्द्यांवरुन भाजपा आणि मनसे एकच मागणी करत असताना आजा भाजपाच्या आचार्य तुषार भोसलेंनी कठोर शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. प्रत्येक मंदिरात जर एक ‘ठाकरे-पवार दानपेटी’ बसवली तर मग मंदिरं उघडली जातील का?, असा प्रश्न भोसले यांनी राज्य सरकारला विचारलाय.
“शिवसेनेला मराठवाडा-विदर्भात भाजपने वाढवलं”, चंद्रकांत पाटलांचं विधान
ज्या गोष्टीत आपल्याला वसुली करता येते केवळ त्यांनाच सवलत द्यायची, हा ठाकरे सरकारचा मुख्य नियम आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिरात जर एक ‘ठाकरे-पवार दानपेटी’ बसवली तर मंदिरं उघडली जातील का ? हा आमचा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. येणारे भाविक-भक्त हा औरंगजेबासारखा ठाकरे पवारांचा ‘झिझीया कर’ समजून त्या दानपेटीत १०-२० रुपये टाकत जातील,” अशी टीका भोसले यांनी केली आहे.
“…आता तसं कुणी म्हटलं कि दुसरा चेहरा नजरेसमोर येतो,” चंद्रकांत पाटलांचं युतीबद्दल मोठं भाष्य
तसेच सर्वसामान्यांसाठी राज्यातील मंदिरं बंद असताना प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मात्र व्हीआयपी लोकांना दर्शन देण्यात येत असल्याची बातमी प्रसार माध्यमात प्रसिध्द झाली होती. त्यावरून भोसले यांनी खोचक शब्दात राज्य सरकारला टोला लगावला आहे. “नाहीतरी आजही अनेक ‘खास’ लोकं या तुमच्या दान पेटीत दान टाकूनच मागच्या दाराने दर्शन घेत आहेत,” असं भोसले म्हणालेत. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, निर्माती-दिग्दर्शक एकता कपूर यासारख्या व्हिआयपी लोकांना दर्शन देण्यात आल्याचे पुरावे नोंद वही आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यावरुनच ही टीका करण्यात आली आहे.
Read Also :
- “खंजीर खुपसणाऱ्या सेनेला धडा शिकवण्यासाठी हेच एक उत्तर!”, पाटलांनी सांगितला फॉर्म्युला
- “अनिल परबांची विकेट काढल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणारा नाही!” सोमैय्यांचा इशारा
- “राऊत, बेळगाव जिंकू! हा दावा करत असतील तर…”, चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली
- मंदिरे उघडा! मनसे-भाजप आक्रमक, अजित पवारांनी सांगितले मंदिरे कधी उघडणार…
- “नमस्कार ताई, तुम्हाला शब्द देतो…”, मुख्यमंत्र्यांनी दिले कल्पिता पिंपळेना आश्वासन