मुंबई : बेळगाव महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षानंतर आज मतदान होत आहे. या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
बेळगाव महापालिकेवर शिवरायांचा भगवाच फडकेल, मराठी माणसाचीच सत्ता येणार – संजय राऊत
त्यांच्या वक्तव्यावर, आज अकोल्यात असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया दिली असून, “बेळगाव जिंकू! असा राऊत दावा करत असतील, तर त्यांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो,” असा टोला लगावला आहे. तसेच, कोकणतील दोन नगरसेवकांसह नारायण राणे काल शिवसेनेत प्रवेश केला. यावर बोलताना, “मला माहिती नाही. पण नारायण राणे सक्षम आहेत,” असं ते म्हणाले.
मंदिरे उघडा! मनसे-भाजप आक्रमक, अजित पवारांनी सांगितले मंदिरे कधी उघडणार…
दरम्यान, “कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत समितीचे शुभम शेळके त्यांना लाखावर मते पडली होती. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसं उत्साही वातावरण दिसतंय. मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा. मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे. हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मोठी बातमी : बैलगाडा शर्यतींचा ‘धुरळा’ उडणार, न्यायालयाकडून अखेर परवानगी
दुसरीकडे, बेळगाव महापालिका निवडणूक पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षांकडून लढवली असून, भाजप, कॉंग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल, आप व एमआयएम या पक्षाचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूकीतील रंगत व चुरस वाढली आहे. बेळगाव दक्षिणचे भाजपचे आमदार अभय पाटील यांनी आज होत असलेल्या निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावला असून, बेळगावकरांना मतदानाचे आवाहन करत, महापालिकेत भाजपचाच महापौर होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
Read Also :
- भाजपाचे कार्यकर्ते नुसते थुंकले तरी हे सरकार वाहून जाईल
- “नमस्कार ताई, तुम्हाला शब्द देतो…”, मुख्यमंत्र्यांनी दिले कल्पिता पिंपळेना आश्वासन
- राष्ट्रवादीचे एक पाऊल पारदर्शक कारभाराकडे; ‘सीसीटीव्ही’तून तपासणार स्वत: च्या नगरसेवकांचा खोटारडेपणा
- भाजपचा झोलझाल, चंद्रकांत पाटलांनी लिलाव करून पदे वाटली – राष्ट्रवादी
- नियम पाळा, पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका – अजितदादांनी खडसावलं