पुणे : आगामी महापालिका अवघ्या काही महिन्यावर येवून ठेपल्या असताना पुणे महापालिकेमध्ये भ्रष्टाचार बोकाळत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादीने मोर्चेबांधमी सुरू केली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी दाखल केलेल्या विषयांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या समिती सदस्यांनी खरोखरच विरोध केला की ते सदस्य खोटे बोलतात हेच आता स्थायी समितीच्या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज मागवून तपासले जाणार आहे. हे सदस्य खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले तर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत पक्षच विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रार करणार आहे,” अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेतच जाहीर केली. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पारदर्शकतेकडे वाटचाल करत असून त्याची सुरूवात स्वत: पासूनच केली असल्याची चर्चा रंगताना पहायला मिळत आहे.
12 आमदारांच्या यादीत राष्ट्रवादीकडून ढवळाढवळ; राजू शेट्टी यांचा केला “करेक्ट कार्यक्रम”
गुरुवारी (दि. २) महापालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते. यावेळी ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेविका आणि विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि स्थायी समिती सदस्य नंदा लोणकर, बंडू गायकवाड उपस्थित होते. जगताप म्हणाले, “स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी दीपाली धुमाळ यांनी समिती सदस्यांना पक्षाच्या धोरणाबाबत माहिती दिली होती.” या वक्तव्यावर लोणकर यांनी आक्षेप घेत ‘आता आम्हालाही बोलायचे आहे’ असे म्हटले. “स्थायी समितीच्या बैठकीच्या आदल्या दिवशी धुमाळ यांनी आमची बैठक घ्यायला हवी होती,” अशी टिप्पणी लोणकर यांनी केली.
भाजपचा झोलझाल, चंद्रकांत पाटलांनी लिलाव करून पदे वाटली – राष्ट्रवादी
लोणकर यांना प्रत्युत्तर देण्यास निघालेल्या धुमाळ यांच्यासह लोणकर यांना जगताप यांनी थांबवले. त्यामुळे पुढचा प्रसंग टळला. मात्र जाहीर पत्रकार परिषदेतच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये या ठिणग्या उडाल्याची चर्चा त्यानंतर महापालिकेत रंगली. “एखाद्या विषयात पक्षाकडून सूचना केली गेली नसली तरी, संबंधित बैठकीला जाण्यापूर्वी सदस्यांनी स्वत:हून माहिती घेणे आवश्यक आहे,” असेही जगताप यांनी यावेळी सुनावले. त्यामुळे आता जगताप ‘सीसीटीव्ही’तून कोणते सत्य शोधून काढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
निर्णय अजित पवारच घेतील
दीपाली धुमाळ व नंदा लोणकर या नगरसेविकांना शांत केल्यानंतर जगताप यांनी नगरसचिवांकडून स्थायी समितीच्या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज मागविले असल्याचे सांगितले. बैठकीत खरोखरच गोंधळ झाला व घोषणाबाजीत ऐनवेळी दाखल झालेले विषय सत्ताधाऱ्यांनी मान्य करून घेतले की राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपाच्या निर्णयात सहभागी होते हे तपासणार असल्याचे जगताप म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थायी समिती सदस्य अनेक वादग्रस्त विषयांवर सत्ताधारी भाजपाला वारंवार पाठींबा देतात याची माहिती अजित पवार यांना देणार आहे. त्यानंतर ‘स्थायी’तल्या ‘राष्ट्रवादी’च्या चार सदस्यांचे काय करायचे याचा निर्णय पवारच घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Read Also :
- नियम पाळा, पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका – अजितदादांनी खडसावलं
- मोठी बातमी : बैलगाडा शर्यतींचा ‘धुरळा’ उडणार, न्यायालयाकडून अखेर परवानगी
- १२ आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याच्या चर्चेवर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया
- विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – विनायक मेटे
- “त्यावेळी कुठे गेला कायदा? नवाब मलिकजी…”, CBI च्या कारवाईवरून भाजप-राष्ट्रवादीत वाक्युद्ध